News Flash

“हा आमचा जिगरचा तुकडा”; नीति मोहनने शेअर केलेला फोटो चर्चेत

नीति मोहन सोशल मीडियावर सक्रिय असून मुलासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते.

niti-mohan-arayveer
(Photo-Niti Mohan/ Instagram)

अभिनेता निहार पांड्याची पत्नी आणि लोकप्रिय गायिका नीति मोहनने २ जूनला मुलाला जन्म दिला. सध्या ते दोघे पालकत्व एजॉय करत आहेत. नीति ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तसंच इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. मात्र या फोटोत कधी ही  तिने तिच्या मुलाचा चेहरा दाखवला नाही, आता नीतिने पहिल्यांदाच मुलाच्या चेहऱ्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नीतिने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले असून यात निहारसुद्धा आहे.

नीतिने शेअर केलेल्या फोटोत निहार आणि नीति आपल्या बाळासोबत पोझ देत हसत आहेत. या फोटोत तिघांनी पारंपरिक गणवेश परिधान केला आहे. आर्यावीर नीति आणि निहारच्यामध्ये आहे आणि त्यांचे हे फोटो फारच गोड दिसत आहे.  त्यांच्या या छोट्याश्या कुटुंबाचे क्यूट फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील फोटोला पसंती देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत नीतिने कॅप्शन दिलं, “हा आहे आमचा जिगरचा तुकडा आर्यावीर , जेव्हा पासून हा आमच्या आयुष्यत आला आहे तेव्हा प्रत्येक दिवस जादू सारखा वाटतो. आर्यावीर जे काही करत आहे सकाळ असो किंवा रात्र प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्याच्या येण्याने आमच्या घरात उत्साह आणि प्रेमचे वातावरण असून आम्ही धन्य झालो आहोत. आम्ही आमच्या मुलासाठी एक चांगले आई-वडील बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by NEETI MOHAN (@neetimohan18)

नीतिने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी लाइक्सचा वर्षाव करताना दिसले. तसंच कमेंट करत फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसले. अनेक कलाकार देखील कमेंट करुन या छोट्याश्या कुटुंबाचे कौतुक करत आहेत. नीति मोहनची बहीण आणि बाळाची मावशी डान्सर मुक्ती मोहनने “हमारा बाप आया है आणि सोशल मीडिया डेब्यु पुरसकार जातो आर्यावीरला” अशी कमेंट केली आहे.

niti-mohan (Photo-Neeti Mohan Instagram)

मुलाच्या जन्मानंतर निहारने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. “माझ्या वडिलांनी जे मला शिवकलं ते माझ्या मुलाला शिवकण्याची संधी माझ्या पत्नीने मला दिली आहे. प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यात आनंद पसरवत आहे.” असं म्हणत निहारने एक सुंदर पोस्ट शेअर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 12:20 pm

Web Title: niti mohan and nihar pandye shares sons aryaveer first photo aad 97
Next Stories
1 मोदी, अक्षय कुमार यांच्यानंतर आता बेयर ग्रिल्ससोबत झळकणार ‘सिंघम’
2 “तिचीच चूक असणार!…”साकीनाका बलात्कार प्रकरणी हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
3 सुहाना खानने न्यू यॉर्कमध्ये केलं फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X