आपल्या डान्सच्या मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोराचे लाखो चाहते आहेत. नोरा कधी तिच्या डान्समुळे तर कधी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. आता सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ नोराच्या छोर देंगे या गाण्याचा बीटीएस व्हिडीओ आहे. या व्हिडीओत नोरा केसांच्या विगसोबत खेळताना दिसत आहे. त्यानंतर तिला समजते की तिला रात्रभर गाण्याच शूट करायचं आहे. यावर उदास होऊन नोरा “मी झोपेन” असं म्हणते. तसंच “४ दिवसांपासुन गाणं शूट करत आहेत आणि ४ दिवस मी नीट झोपलेले नाही.” असं नोरा या व्हिडीओत सांगतेय. तर य़ा पुढील व्हिडीओ म्हणजेच “या व्ह्लॉगचा दुसरा भाग हा माझ्या अधिकृत युट्युब चॅनलवर आहे.” असं तिने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
View this post on Instagram
रात्री उशिरा होणाऱ्या शूटशिवाय, राजस्थानच्या कडक उन्हाळ्यात मोठा लेहेंगा परिधान करून नोराने डान्स केला आहे. एवढंच नाही तर तिने आगीच्या समोर डान्स केला आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये नोराने राजस्थानच्या बंजारा लोकांचे पारंपारिक वस्त्र परिधान केले होते. या म्युझिक व्हिडिओमध्ये नोराने राजस्थानच्या बंजारा लोकांचे पारंपारिक वस्त्र परिधान केले होते.
हे गाणं प्रदर्शित झाल्या नंतर एका दिवसातच युट्यूबवर १५ कोटींपेक्षा जास्त व्ह्युज आहेत. हे गाणं टी- सीरिजच्या अधिकृत युट्युब अकाऊंटवरून प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणं योगेश दुबे यांनी लिहिले आहे. तर हे गाणे परंपरा टंडनने गायल आहे. या गाण्याची कोरिओग्राफी रजित देव याने केली आहे.