News Flash

यश मिळवण्यासाठी काहीही; ज्योतिषाच्या सांगण्यावरुन ‘या’ अभिनेत्रीनं बदललं स्वत:चं नाव

या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं ज्योतिषाच्या सांगण्यावरुन बदललं नाव

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती कुठल्याही फोटोमुळे नव्हे तर चक्क स्वत:च्या नावामुळे चर्चेत आहे. नुसरतने आपल्या नावाचं स्पेलिंग बदललं आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर नवं स्पेलिंग लिहिल्यामुळे चाहते देखील कोड्यात पडले आहेत.

अवश्य पाहा – ‘गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करायचं आहे का?’; त्या व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे विरोधात तक्रार

नुसरतने का बदललं आपल्या नावाचं स्पेलिंग?

नुसरत आधी आपल्या नावाचं स्पेलिंग इंग्रजीमध्ये Nushrat Bharucha असं लिहायची. आता तिने या स्पेलिंगमध्ये T आणि C ही दोन अक्षर वाढवली आहे. त्यामुळे तिचं नाव Nushrratt Bharuccha असं दिसत आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या नावात का बदल केला? याचं कारण सांगितलं.

अवश्य पाहा – ‘अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलतायेत?’; महेश टिळेकर यांचा सवाल

ती म्हणाली, “अंकशास्त्र, ज्योतिष शास्त्र, टॅरो कार्ड वगैरे या गोष्टींवर माझा पूर्ण विश्वास आहे. कितीही मेहनत केली तरी देखील जेवढं नशीबात असतं तेवढंच आपल्याला मिळतं. या संकल्पनेवर मी विश्वास ठेवते. अलिकडेच मी अंकशास्त्र विषयात तज्ज्ञ असलेल्या एका व्यक्तीस भेटले होते. त्यांच्या सल्ल्यानुसार करिअरमध्ये अधिक यश मिळवण्यासाठी मी आपल्या नावात काही बदल केला आहे. या नव्या स्पेलिंगमुळे माझं करिअर आणखी उंचीवर जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 5:03 pm

Web Title: nushrratt bharuccha change her name mppg 94
Next Stories
1 मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण
2 ‘छकुला’नंतर पुन्हा एकत्र येणार बाप-लेकाची जोडी; ‘झपाटलेला ३’मध्ये झळकणार आदिनाथ- महेश कोठारे?
3 पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत – अपूर्वा नेमळेकर