News Flash

‘Once मोअर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

‘Once मोअर’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा शोध दिसून येतोय. शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखेमुळे या चित्रपटात नक्की काय असावे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली

मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. प्रेक्षकवर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांचे चांगलं स्वागत होत आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. सोशल साईट्सवर या पोस्टरला चांगला प्रतिसाद मिळतोय.

एखादी गोष्ट आवडल्यानंतर त्याला ‘वन्स मोअर’ची दाद हमखास मिळते. पण ‘Once मोअर’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा शोध दिसून येतोय. या शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखेमुळे या चित्रपटात नक्की काय असावे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली आहे. ‘चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटात ‘कुछ हटके’ आहे असे तुम्हाला वाटेल. हा शोध नेमका कशाचा आहे? शोध घेणारी ती व्यक्ती कोण? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटातून कोणता विषय हाताळण्यात येणार आहे? या सगळ्या गोष्टींवरून लवकरच पडदा उठणार आहे.

या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे. धनश्री विनोद पाटील, देवस्व प्रोडक्शन या चित्रपटाचे निर्माते आहेत. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय सिंग यांनी सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 6:55 pm

Web Title: once more marathi movie motion picture released
Next Stories
1 …म्हणून शिल्‍पा शेट्टी तिच्‍या मुलाला साखरेपासून ठेवते दूर
2 Big Boss Marathi: घरातील रहिवाश्यांना मिळाले पहिले लक्झरी बजेट
3 बायकोसाठी विराट कोहलीने असे व्यक्त केले प्रेम
Just Now!
X