झी मराठी, झी युवा आणि झी टॉकीज या लोकप्रिय वाहिन्या सादर करणाऱ्या झी समूहने मराठी प्रेक्षकांसाठी झी वाजवा ही नवीन संगीत वाहिनी आणली. “झी वाजवा, क्षण गाजवा”, या वाहिनीच्या ब्रिदवाक्याला अनुसरून प्रेक्षकांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अगदी भरभरून जगण्याची प्रेरणा देण्याचा वाहिनीचा उद्देश आहे. ही वाहिनी प्रेक्षकांना डॉल्बी आवाजात ३००० पेक्षा जास्त गाणी आणि वेगवेगळ्या शैलीच्या कार्यक्रमांची मेजवानी देणार आहे.

गाण्यांसोबतच ही वाहिनी आठवड्याच्या शेवटी एक अनोखा विनोदी कार्यक्रम देखील प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘भावड्याची चावडी’. या कार्यक्रमाची कथा भावड्या या कुठल्याही सामान्य मुलासारख्या असलेल्या मुलाभोवती फिरते. हा एक तरुण मुलगा आहे ज्याला असं वाटत की त्याच्याकडे खूप टॅलेंट आहे पण त्याला नक्की आयुष्यात पुढे काय करायचंय हे अजून कळलं नाही. याच गोष्टीवर चर्चा करत भावड्या आणि त्याचे अजून २ मित्र त्याच्यासोबत चावडीवर वेळ घालवतात आणि त्यांच्या या चर्चेत ते अनेक कलाकारांना देखील आमंत्रित करून वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची मतं जाणून घेतात. या कार्यक्रमातील भावड्या हा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता पार्थ भालेराव आहे. या कार्यक्रमातून तो पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर आणि इतर अनेक कलाकार सेलिब्रिटी गेस्ट म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

टेलिव्हिजन पदार्पणाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना पार्थ भालेराव म्हणाला, “मी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी वाजवा या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा हजर होतोय आणि यावेळी प्रथमच टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय यासाठी मी खूप उत्सुक आहे. भावड्याची चावडी या कार्यक्रमात मी अगदी वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. दुप्पट मजा, भरपूर मनोरंजन आणि आम्ही कलाकारांसोबत केलेला वेडेपणा या कार्यक्रमातून प्रेक्षक अनुभवू शकतील.”