बॉलिवूडच काय पण टीव्ही इण्डस्ट्रीतही आता लग्नाचे वारे वाहू लागेल आहेत. गौतम रोडे, गौरव चोप्रा, दीपिका कक्करनंतर आता छोट्या पडद्यावरची आणखी एक अभिनेत्री कुस्तीपटूसोबत विवाह बंधंनात अडकणार आहे. पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंग या वर्षाअखेरपर्यंत विवाह बंधनात अडकणार आहे. पायल आणि संग्राम गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी वर्षभरापूर्वी साखरपुडाही केला होता पण काही कारणांनी त्यांनी आपला विवाह पुढे ढकलला होता. पण आता मात्र थांबून वेळ वाया घालवण्यात काहीच उपयोग नाही, लग्न करण्याची वेळ आली असल्याचं तिनं एका मुलाखतीत म्हटलं आहे. संग्राम हा कुस्टीपटी, अभिनेता आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात तो दिसला होता. पायलनंही छोट्या पडद्यावर तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटात छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. बिग बॉसच्या सातव्या पर्वात ती दिसली होती. संग्राम आणि पायल गेल्या सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत मात्र कामच्या गडबडीमुळे त्यांनी विवाह करण्याची तारीख पुढे ढकलली होती. मात्र आता वेळ वाया घालवून काहीच उपयोग नाही. लग्न करण्याची घाई आम्ही केली पाहिजे असं ती म्हणाली आहे त्यामुळे या वर्षाअखेर पर्यंत हे दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2018 रोजी प्रकाशित
आणखी एक खेळाडू अडकणार विवाहबंधनात
आता लग्न करण्याची वेळ जवळ आली आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 09-03-2018 at 16:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Payal rohatgi and sangram singh all set to tie the knot this year