नवीन पिढी संगीत वेगवेगळ्या वाद्यांच्या माध्यमातून, शैलीतून, प्रयोग करीत श्रोत्यांपर्यंत पोहोचवित आहे. यामध्ये वेगळेपणा असला तरी संगीतामुळे दोन परस्परभिन्न व्यक्तींची मने जुळली जातात. याच धर्तीवर ‘रेडिओ सिटीने’ आयोजित केलेल्या ‘संगीत आणि त्यापलीकडे’ या उपक्रमाअंतर्गत भारतातील वेगवेगळ्या भाषेतील गायकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. या उपक्रमामुळे गायकांना स्वत:च्या भाषेतील लोकसंगीत श्रोत्यांसमोर सादर करण्याची संधी मिळणार आहे.

‘रेडिओ सिटी स्वतंत्र पुरस्काराचे’ हे तिसरे वर्ष आहे. ११ विविध प्रकारात हिप-हॉप रॅप कलाकार, सवरेत्कृष्ट लोककला फ्युजन कलाकार, सवरेत्कृष्ट पॉप(लोकप्रिय) कलाकार, सवरेत्कृष्ट रॉक, सवरेत्कृष्ट मेटल, सवरेत्कृष्ट इलेक्ट्रॉनिका, सवरेत्कृष्ट चित्रफित, सवरेत्कृष्ट अल्बम कलाकार, सवरेत्कृष्ट युवा भारतीय कलाकार किंवा बॅण्ड, सवरेत्कृष्ट भारतीय वाद्यमेळ आणि भारतीय प्रतिभावंत या प्रकारांचा समावेश आहे.

१५ फेब्रुवारीपर्यंत ही निवड चाचणी संपून पाच स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठीची निवड चाचणी ल्युक केनी, अतुल चुडामणी, योतम आगम, नंदिनी श्रीकर या परीक्षकांची समिती करणार आहे.

संगीत ही कला जोपासणाऱ्याांठी उदयोन्मुख गायक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे ‘रेडिओ सिटी ९१.१ एफएमचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी अबाहम थॉमस यांनी सांगितले. या उपक्रमातून संगीताची एक समांतर दुनिया देशात उभी राहील व या संगीत कलाकारांची ओळख जगभरातील संगीत दिग्दर्शकांना होईल असा विश्वास थॉमस यांनी व्यक्त केला.

या उपक्रमात मराठी, मल्याळम, बंगाली, पंजाबी, आसामी, तमिळ आदी प्रादेशिक भाषेतील स्पर्धक सहभागी झाले आहेत.