16 January 2021

News Flash

‘पीएम मोदी’ पुन्हा चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित, निर्माता संदीप सिंहने केली घोषणा

हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. पण आता केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर पासून चित्रपटगृहे सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटगृहे उघडताच ‘PM नरेंद्र मोदी’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “पीएम नरेंद्र मोदी” या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. पण त्यावेळी देशात असलेल्या निवडणूकांमुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रपटगृहे सुरु होताच पुन्हा पाहायला मिळणे या पेक्षा काय चांगलं असू शकतं असे संदीपने म्हटले आहे. त्यामुळे आता चित्रपट निर्माता संदीप सिंहने हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणार असल्याची माहिती दिली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट २०१९ सालच्या लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रदर्शित झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास चित्रपटगृहे सुरु होताच पुन्हा पाहायला मिळणे या पेक्षा काय चांगलं असू शकतं. आता पुन्हा चित्रपटगृहे उघडणार असल्यामुळे मी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा विचार केला आहे. माझा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा टीव्हीवर प्रदर्शित झालेला नाही’ असे संदीपने म्हटले आहे.

विवेक ओबेरॉय या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. विवेकसोबतच या चित्रपटात बरखा बिश्त जशोदाबेन तर अभिनेते मनोज जोशी हे अमित शाह यांच्या भूमिकेत आहेत. याशिवाय बमन इराणी, झरीना वहाब, सुरेश ओबेरॉय आणि प्रशांत नारायणन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 2:58 pm

Web Title: pm narendra modi movie to re release in theaters on october 15 avb 95
Next Stories
1 म्हणून अली फजलवर होत आहे बहिष्कार टाकण्याची मागणी ?
2 कंगनाविरोधात FIR दाखल करा; कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
3 ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे चित्रपट गमावावे लागले, अभिनेत्रीचा खुलासा
Just Now!
X