25 November 2020

News Flash

ठरलं तर! प्रभासचा आदिपुरुष ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ओम राऊत करणार दिग्दर्शन

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हे नाव आता चाहत्यांसाठी नवीन राहिलेलं नाही. ‘बाहुबली’ चित्रपटातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेला प्रभास लवकरच आदिपुरुष या आगामी चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार हा एकच प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओम राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यानुसार, ११ ऑगस्ट २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजून बराच वेळ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान,हा चित्रपट श्रीरामचंद्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सैफ रावणाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 3D अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 10:17 am

Web Title: prabhas upcoming film adipurush will be released on this date ssj 93 dcp 98
Next Stories
1 ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेचा वाद अखेर संपुष्टात
2 सलमानच्या ड्रायव्हरला करोनाची लागण
3 ‘मी केबीसीमध्ये पोहोचले’, जुही चावलाचे ट्विट व्हायरल
Just Now!
X