News Flash

प्रतिक्षा मुणगेकर ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून येणार पुन्हा आपल्या भेटीला

'जीव माझा गुंतला' मालिकेत प्रतिक्षा दिसणार महत्वाच्या भूमिकेत.

'जीव माझा गुंतला' मालिकेत प्रतिक्षा दिसणार महत्वाच्या भूमिकेत.

छोट्या पडद्यावरील जीव माझा गुंतला मालिकेचे काही प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता आहे. मालिकेची पट कथा काय असेल, कोण कोण कलाकार मालिकेत असतील? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना समोर आहेत. या मालिकेतून आपल्या सगळ्यांची प्रतिक्षा आपल्याला पुन्हा एकदा भेटायला येणार आहे.

घाडगे & सून या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये अबाधित स्थान मिळवले. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेत. यामध्ये अजून एका नावाची कमतरता आहे आणि ते म्हणजे कियारा. कियाराची भूमिका साकारणारी प्रतिक्षा मुणगेकर तीन वर्षानंतर पुन्हाएकदा कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ या नव्या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा : इंडियन आयडल १२ : ‘या’ दोन गायकांना हिमेश रेशमीयाने दिली म्युझिक अल्बममध्ये संधी

 

View this post on Instagram

 

A post shared by (@pratikshamungekarofficial)

प्रतिक्षा मालिकेत चित्रा खानविलकरच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “खरं सांगायचं तर मला घरी परतल्यासारखं वाटतं आहे. तब्बल तीन वर्षानंतर मी पुन्हा कलर्स मराठीवर मालिका करते आहे आणि टेल-अ-टेल मिडीयाचं प्रॉडक्शन हाऊस आहे, हा एक योगायोग म्हणावा लागेल. वाहिनी आणि प्रॉडक्शन हाऊसने इतका विश्वास दाखवला आहे त्यामुळे माझी जबाबदारी खूप वाढली आहे असं मला वाटतं. खूप मजा येते आहे सेटवर, तीच लोकं आहेत आजूबाजूला, खुप सकारात्मक वातावरण आहे. त्याच जोमाने काम करणारे आहेत. ज्याप्रकारे कियारावर प्रेम केलं तसेच चित्रावर देखील करा हीच ईच्छा आहे.”

आणखी वाचा : टायगर आणि दिशाच्या रिलेशनशीपवर जॅकी श्रॉफ यांचे वक्तव्य, म्हणाले…

दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार – अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे. तेव्हा नक्की बघा ‘जीव माझा गुंतला’ २१ जूनपासून सोम ते शनि रात्री ९.३०वा. आपल्या कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 12:19 pm

Web Title: pratiksha mungekar in jiv majha guntala serial marathi serial update dcp 98
Next Stories
1 प्रतिक्षा संपली! ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 International Yoga Day: कंगना रनौतचा अनोखा दावा, योगामुळे दोन महिन्यात ठणठणीत झाली आई
3 टायगर आणि दिशाच्या रिलेशनशीपवर जॅकी श्रॉफ यांचे वक्तव्य, म्हणाले…
Just Now!
X