04 August 2020

News Flash

संजय गुप्तांच्या ‘जजबा’तून प्रिया बॅनर्जीचे बॉलिवूड पदार्पण

संजय गुप्ता यांच्या 'जजबा' या महत्वाकांक्षी चित्रपटातून प्रिया बॅनर्जी ही दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

| January 20, 2015 07:32 am

priya-banerjee-450संजय गुप्ता यांच्या ‘जजबा’ या महत्वाकांक्षी चित्रपटातून प्रिया बॅनर्जी ही दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. काही तमिळ आणि तेलगू चित्रपटांमधून भूमिका साकारलेल्या प्रियाला टि्वटरमुळे या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याचे समजते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, प्रियाचा अभिनय असलेले काही व्हिडिओ टि्वटरवर पोस्ट करण्यात आले होते. चित्रपटातील या भूमिकेसाठी संजय गुप्ता यांनी कोणत्याही अभिनेत्रीची निवड केलेली नव्हती. तसेच, चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरनेसुद्धा कोणाला कास्ट केले नव्हते. अशातच एक दिवस अचानक कोणी तरी प्रियाचा अभिनय असलेला व्हिडिओ संजय गुप्तांना टि्वटरवर टॅग केला. त्यांच्याकडे मोकळा वेळ असल्याने त्यांनी तो व्हिडिओ पाहिला. त्यावेळी प्रियाला या भूमिकेसाठी घ्यावे, असे त्यांच्या मनातदेखील नव्हते. परंतु, प्रियाच्या अभिनयाने त्यांना खिळवून ठेवले. कॅनडामध्ये वाढलेली प्रिया या भूमिकेसाठी योग्य असल्याचे मानणे आहे. याविषयी बोलताना स्वत: संजय गुप्ता म्हणाले, प्रियाचा एक तमिळ चित्रपट आणि लघुपट असलेल्या व्हिडिओंमध्ये कोणी तरी मला टॅग केले. हे व्हिडिओ मी पाहिले आणि मला तिचे काम आवडले. नंतर मी माझ्या कास्टिंग डायरेक्टरला तिला शोधायला सांगितले. पुढे जाऊन तिने अद्याप हिंदी चित्रपटात काम न केल्याचे समजले. आम्ही तिची ऑडिशन घेतली. ऑडिशनमध्ये ती खूप प्रभावी वाटली. ती एक चांगली अभिनेत्री असून, चित्रपटातील तिची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी, तिच्या भूमिकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. ‘जजबा’चित्रपटाद्वारे बॉलिवूडची अघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुनरागमन करीत आहे. या चित्रपटात इरफान खान, शबाना आझमी, श्रद्धा कपूर, अनुपम खेर, अतुल कुलकर्णी, चंदन रॉय सन्याल यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात जॉन अब्राहम पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. या महिन्यात चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. परंतु, इरफान खानच्या शस्त्रक्रियेमुळे चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2015 7:32 am

Web Title: priya banerjee to make her bollywood debut with sanjay guptas jazbaa
Next Stories
1 सनीसाठी प्रियांका चोप्रा प्रेरणादायी
2 यशवंत देव यांचा जीवनपट उलगडणार!
3 आई आणि मुलगा एकाच चित्रपटात
Just Now!
X