News Flash

Coronavirus : महिलांसाठी ‘देसी गर्ल’ने पुढे केला मदतीचा हात; देणार १ लाख डॉलर्स

प्रियांका-निकने मिळून काही सामाजिक संस्थांनाही ठराविक रकमेची मदत दिली.

प्रियांका चोप्रा

करोना व्हायरसशी लढा देण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ येऊ लागला आहे. यामध्ये कलाकारांनी पुढाकार घेत ठराविक रक्कम दान केली आहे. त्यातच आता बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राचाही समावेश झाला आहे. या कठीण काळात लढा देणाऱ्या महिलांसाठी प्रियांका एक लाख डॉलर्सची मदत करणार आहे. इतकंच नव्हे तर विविध सामाजिक संस्थांना तिने व पती निक जोनासने मिळून ठराविक रक्कम दिली आहे. ट्विटरद्वारे प्रियांकाने यासंदर्भात माहिती दिली.

याव्यतिरिक्त प्रियांका सोशल मीडियावर एक मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेअंतर्गत ती चार महिलांची कथा जगासमोर आणणार आहे, ज्यांनी संघर्षाच्या काळात अभूतपूर्व कामगिरी केली. प्रियांका व निकने चाहत्यांनाही जमेल तितकी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा : ‘स्टार वॉर्स’ फेम अभिनेता अँड्र्यू जॅकचा करोना व्हायरसमुळे मृत्यू

करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे रोजंदारी कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकुमार राव, विकी कौशल, अक्षय कुमार, सलमान खान, अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांनी आतापर्यंत आर्थिक मदत दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 10:42 am

Web Title: priyanka chopra donate 1 lakh dollars to women who are rising above everything during coronavirus crisis ssv 92
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : ‘स्टार वॉर्स’ फेम अभिनेता अँड्र्यू जॅकचा करोना व्हायरसमुळे मृत्यू
2 ‘यापुढे अपमानास्पद कमेंट केली तर…’; ऋषी कपूर ट्रोलर्सवर भडकले
3 करोनाचा ‘वंडर वुमन’ला फटका; वर्षातील सर्वात मोठा चित्रपट लांबणीवर
Just Now!
X