News Flash

शाहीद म्हणतो, प्रियांका टॉप फॉर्ममध्ये

दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचेही अभिनंदन केले

शाहीद सध्या विशाल भारद्वाज यांच्या 'रंगून' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान आणि कंगना राणावतही आहेत.

‘बाजीराव-मस्तानी’मधील अभिनयाबद्दल अभिनेता शाहीद कपूरने अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांचे कौतुक केले. ट्विटरवर केलेल्या ट्विटमधून त्याने या दोघींच्या कामाचे कौतुक करताना दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचेही अभिनंदन केले.


प्रियांका टॉप फॉर्ममध्ये असल्याचे शाहीदने म्हटले आहे तर दीपिकाही कलाकार म्हणून छानपणे पुढे येत असल्याचे त्याने ट्विटरवर लिहिले आहे. त्याच्या या ट्विटला प्रियांका आणि दीपिकाने लगचेच उत्तर दिले. हा चित्रपट तुला आवडल्याचे वाचून आनंद वाटला, असे प्रियाकांने म्हटले आहे तर दीपिकाने शाहीद कपूरचे आभार मानले आहेत.
शाहीद सध्या विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान आणि कंगना राणावतही आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 6:40 pm

Web Title: priyanka chopra in top form shahid kapoor
Next Stories
1 आमिरने कडेकोट सुरक्षेत सहकुटुंब पाहिला ‘स्टार वॉर्स’
2 ‘तो’ क्षण मला कधीच विसरता येणार नाही, ‘मिस’टेक प्रकरणी ‘मिस कोलंबिया’ची प्रतिक्रिया
3 ‘कपूर अॅण्ड सन्स’च्या ‘मेकअप’साठी ऋृषी कपूर यांना लागतात पाच तास!
Just Now!
X