25 February 2021

News Flash

VIDEO: ‘इथे सारे दीड शहाणे..’पुणेरी रॅप साँग ऐकलेत का?

आम्ही पुणेरी...

छाया सौजन्य- युट्यूब

पुणे म्हटलं की अनेकांच्याच मनात विविध संकल्पना तयारच असतात. पुणे म्हणजे अमुक…आणि पुणे म्हणजे तमुक. असं म्हणणाऱ्यांसाठी नवं कोरं रॅप साँग प्रदर्शित करण्यात आले आहे. पुणेरी ढोलताशा पथक, शनिवार वाडा आणि पुणेरी बाणा या सर्वांचे दर्शन या रॅप साँगमधून होत आहे. आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी तरुणाईला भुरळ घालणारे ‘रॅपसाँग’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पश्चिमात्य संगीताचा प्रकार असलेल्या या रॅपसाँगचे मराठीकरण करण्याचे काम गायक श्रेयस जाधव याने केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बघतोस काय मुजरा कर;’ या सिनेमाचे तरुण निर्माता असलेला श्रेयस एक चांगला रॅपर देखील आहे.

मराठी अस्मिता आणि खास करून अस्सल पुणेकर असलेला श्रेयस लवकरच ‘आम्ही पुणेरी…’ हे रॅप गाताना दिसणार आहे. नुकत्याच या रॅपसाँगच्या टीजर आणि पोस्टरचे सोशल मिडीयावर अनावरण करण्यात आले होते. पुणेरी बाणा आणि खास शैली असणाऱ्या पुणेकरांसाठी हा रॅप मोठी पर्वणी ठरत असून मुंबईकरांसाठी देखील हे गाणे विशेष ठरणार आहे.
श्रेयसने यापूर्वी ऑनलाईन बिनलाईन’ सिनेमातील ‘ओ हो काय झालं’ या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये रॅप गायले होते. विशेष म्हणजे मराठी-हिंदी फ्युजन असलेल्या या गाण्याला आणि त्याच्या या रॅपला लोकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला असल्या कारणामुळेच, एक संपूर्ण रॅप असलेलं गाणं ‘पुणे रॅप’च्या माध्यमातून श्रेयस लोकांसमोर घेऊन आला आहे. या गाण्याचे प्रत्येक बोल तरुणाईला भुरळ पाडणारे आहेत. हे गाणं पुण्याबद्दल असून यात पुणेरी वैशिष्ट्यांचा उल्लेख तर आहेच पण त्यासोबतच प्रसिध्द शनिवारवाड्याचे भव्य दिव्य रूपही यात पाहायला मिळत आहे.

कट्टर पुणेकर असणाऱ्या या गाण्याचे बोल वैभव जोशी यांनी लिहिले आहेत. तसेच हृषीकेश, सौरभ आणि जसराज यांचे संगीत यास लाभले आहे. एव्हरेस्ट इंटरटेंमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे हे पुणेरी रॅप मराठी संगीत क्षेत्राला महत्त्वाचे वळण देणारे ठरणार आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला हे गाणे ठेका धरण्यास भाग पाडत आहे असेच म्हणावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 4:04 pm

Web Title: pune rap song video released featuring shreyash jadhav
Next Stories
1 प्रियांका आणि माझ्यात शत्रुत्व नाही- दीपिका पदुकोण
2 ‘हिचकी’मधून राणी करणार पुनरागमन
3 ‘हॉलीवूडने श्रद्धांजली वाहिलेल्या ओम पुरींना बॉलीवूड विसरले’
Just Now!
X