26 September 2020

News Flash

रजनीकांत रमले क्रिकेटच्या मैदानात!

सहअभिनेत्री नयनतारादेखील त्यांच्यासोबत दिसून येत आहे

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांच्या आगामी ‘दरबार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. मुंबईमध्ये या चित्रपटातील काही भागांचं चित्रीकरण होत असून या व्यस्त कामकाजातून थोडीशी उसंत घेत त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लूटला. त्यांच्या या क्रिकेटचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रजीनकांत त्यांच्या क्रु-मेंबर्ससोबत क्रिकेटचा आनंद लूटत आहेत. रजनीकांत बॅटिंग करत असून त्यांच्यासोबत सहअभिनेत्री नयनतारादेखील दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपटाचाच एक भाग असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र क्रिकेट खेळणं ‘दरबार’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा भाग आहे की रजनीकांत आवड म्हणून क्रिकेट खेळत होते हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, ‘दरबार’मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल २५ वर्षानंतर रजीनकांत पोलिसांची भूमिका वठविणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मुरुगदास करत असून रजनीकांत आणि ते पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 4:14 pm

Web Title: rajinikanth enjoyed cricket on the sets of darbar
Next Stories
1 …त्यामुळे मी कोशात गेले होते – प्रिया बापट
2 ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ला भारतात उदंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी भरघोस कमाई
3 मोदींच्या मुलाखतीनंतर ‘या’ व्यक्तीची प्रतिक्रिया माझ्यासाठी खास -अक्षय कुमार
Just Now!
X