News Flash

राजकुमार रावच्या ‘ओमर्ता’ चित्रपटातील नग्न दृश्यांवर सेन्सॉरची कात्री

नुकतेच सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील दोन नग्न दृश्यांवर कात्री लावून सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला आहे.

ओमर्ता

हंसल मेहता दिग्दर्शित ‘ओमर्ता’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले असून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या स्क्रिनिंगला आवर्जुन उपस्थिती लावली होती. नुकतेच सेन्सॉर बोर्डाने सिनेमातील दोन नग्न दृश्यांवर कात्री लावून सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला आहे.

या दृश्यांबद्दल स्पष्टीकरण देताना सिनेमाचे दिग्दर्शक हंसल मेहता म्हणाले की, ‘चित्रपटाला प्रसिद्धी मिळावी यासाठी हे दृश्य चित्रपटात समाविष्ट केले नसून एखादा दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यापूर्वी कोणता विचार करतो हे दाखविण्यासाठी या दृश्यांचा समावेश करण्यात आला.’ कात्री लावण्यात आलेल्या दृश्यांवर सेन्सॉर बोर्डावर नाराजी व्यक्त करताना ते दोन दृश्य सिनेमाचा आत्मा असल्याचे हंसल यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी ‘ओमर्ता’ या सिनेमाला जरी सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले असले तरी त्यातील एका सीनमधून राष्ट्रगीत काढून टाकण्य़ास सांगितले आणि याच अटीवर सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शित होण्याची मंजुरी दिली. प्रदर्शनापुर्वीच हा सिनेमा बऱ्याच वादात अडकला असून काहीही झाले तरी सेन्सॉर बोर्डला सिनेमाला कात्री लावू देणार नाही अशी भूमिका हंसल मेहता यांनी यापूर्वी घेतली होती.

‘ओमर्ता’ हा चित्रपट दहशतवादी अहमद उमर सईद शेख याच्या जीवनावर आधारित असून अभिनेता राजकुमार राव पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटीश दहशतवाद्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. खरे पाहता हा चित्रपट २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने त्यास मान्यता देण्यास दिरंगाई केल्यामुळे तो आता ४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 12:38 pm

Web Title: rajkummar rao starrer omerta is facing censor issues
Next Stories
1 प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो पाहिले का?
2 नोव्हेंबरमध्ये अडकणार दीपिका-रणवीर विवाहबंधनात?
3 …म्हणून स्मृती इराणींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास कलाकारांचा विरोध
Just Now!
X