सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून देशभर विरोधाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी या कायद्यांविरोधात आंदोलनं होत आहेत. दिल्लीतील शाहीन बाग असो वा उत्तर प्रदेशमधील लखनौ किंवा दक्षिण भारतातील केरळमध्ये आंदोलनं होत आहेत. या सगळ्या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ स्पर्धक राखी सावंतने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जे राष्ट्रीय नागरिक नोंदणी अंतर्गत आपले नागरिकत्व सिद्ध करू शकत नाहीत त्यांच्यासाठी तिने एक उपाय सुचवला आहे.
राखी सावंत यांनी आपल्या व्हिडीओमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत लोकांना उपाय सांगितला आहे. राखी म्हणाले, “माझ्याकडे एक उपाय आहे. सीएए आणि एनआरसीची भीती बाळगणारे आणि ज्यांना वाटतं की त्यांच्या कुटुंबियांनी काही कागदपत्रे ठेवली नाहीत, त्यांना भीती वाटत आहे. तर मग तुम्ही चिंता का करता? जर आपल्याकडे जुनी कागदपत्रे नसतील, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही बँकेकडून दीर्घ मुदतीचं कर्ज घ्या आणि मग बँकच हे सिद्ध करेल, की तुम्ही भारतीय आहात. काळजी करण्याची काहीच गरज नाही,” असे तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.