News Flash

राखी सावंत झाली आहे ‘नागिन’, सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा

गाण्याचा व्हिडिओ होत आहे सोशल मीडियावर व्हायरल...

अभिनेत्री, डान्सर राखी सावंत आणि कॉन्ट्रोवर्सी हे समीकरण काही नवीन नाही. ती कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे, फोटोजमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरूनही ती आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असते. आताही ती चर्चेत आली आहे तिच्या एका व्हिडिओमुळे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘नागिन’ चित्रपटातल्या वेशात राखी दिसत आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘नागिन’ या चित्रपटातल्या ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्या गाण्याच्या मूळ व्हिडिओमधला श्रीदेवीचा चेहरा काढून तिने आपला चेहरा तिथे लावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

या व्हिडिओला कॅप्शन देताना ती म्हणते, “मला श्रीदेवीजी फार आवडतात. त्यांचा नागिन हा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. जर त्याचा रिमेक करायचा झाला तर कोणाचा विचार करावा? पहा आणि तुमची पसंती कमेंट्समध्ये कळवा.”

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोच्या नुकत्याच झालेल्या सीझनमध्ये राखी सावंतने सहभाग घेतला होता. यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा सीझन संपल्यानंतर, सध्या राखी तिच्या आईच्या उपचारांमध्ये व्यस्त आहे. तिची आई कॅन्सरशी लढा देत आहे. राखीने ‘बिग बॉस’च्या घरातून 14 लाख रुपये घेऊन एक्झिट घेतली. तिच्या आईच्या उपचारासाठी तिला हे पैसे हवे असल्याचं तिने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 1:52 pm

Web Title: rakhi swanat wants to play the role of shridevi in nagin movie remake vsk 98
Next Stories
1 पॉर्नस्टार असल्यामुळे बॉलिवूडने माझा तिरस्कार केला, सनीचा खुलासा
2 “तू तर परत गर्भात जा”, रिचा चड्ढा भडकली नेटकऱ्यावर
3 अमिताभ बच्चन यांच्या नातीने दिल्या बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा?
Just Now!
X