News Flash

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ : ‘हा’ अभिनेता साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे.

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ : ‘हा’ अभिनेता साकारणार अटलबिहारी वाजपेयींची भूमिका

विजय रत्नाकर दिग्दर्शित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट यावर्षा अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील काही महत्वपूर्ण भूमिकांसाठी कलाकारांची निवड करण्यात येत असून नुकतीच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे.

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मनमोहन सिंग यांच्या आयुष्याबाबत, राजकीय कारकिर्दीबाबत काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये मनमोहन सिंग यांची भूमिका अभिनेता अनुपम खेर साकारणार असून अक्षय खन्ना संजय बारू यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

मनमोहन सिंग आणि संजय बारु यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्यांची निवड करण्यात आल्यानंतर आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठी राम अवतार भारद्वाज या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विवरवर दिली असून त्याच्याबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.

याबाबत ट्विट करत अनुपम खेर यांनी म्हटलं आहे, ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत राम अवतार भारद्वाज यांना सादर करत आहोत.

मनमोहन सिंह यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारूंच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाने काही दिवसांपूर्वी देशात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.त्याप्रमाणेच या पुस्तकाच्या नावावरुनही मोठा वादंग निर्माण झाला होता.त्यामुळे या पुस्तकावर आधारित चित्रपटामुळे आता आणखी कोणता नवा वाद होणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २१ डिसेंबर रोजीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 11:08 am

Web Title: ram avtar bhardawaj look atal bihari vajpayee
Next Stories
1 …आणि हिना खान झाली पुन्हा एकदा ट्रोल!
2 मराठी चित्रपटांची हिंदी ‘धडक’ किती फायद्याची?
3 सगळं गमावण्याच्या भीतीने आयुष्यच बदललं..
Just Now!
X