‘बाहुबली’ या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे राणा डग्गुबाती. ८ ऑगस्ट रोजी राणाने मिहिका बजाज हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर पहिल्यांदाच या दोघांचे फोटो समोर आले आहेत. मिहिकाने लग्नानंतर पहिल्यांदाच राणासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या दोघांची चर्चा सुरु झाली आहे.
मिहिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. यात मिहिकाने फ्लोरल प्रिंटचा टॉप घातला आहे. तर राणाने स्पोर्टिंग हाफ सिल्वह्ज टी-शर्ट घातला आहे. हा फोटो शेअर करत ‘..कारण फक्त तू’, असं कॅप्शन मिहिकाने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राणाने अभिनेत्री नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी नेहाने राणाला त्याच्या हनिमून प्लॅन्सविषयी विचारलं होतं.मात्र, त्यावेळी अॅमस्टडॅममध्ये जायला आवडलं असतं असं राणाने सांगितलं होतं.