29 September 2020

News Flash

रणवीर सिंग आणि रणबीर कपूर एकत्र काम करणार ?

रणबीर दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेंड आहे, तर रणवीर आता दीपिकाचा पती

बॉलिवूडमधील दोन आघाडीचे कलाकार म्हणजे रणवीर सिंग आणि रणबीर कपूर. परंतु अभिनेत्री दीपिका पदुकोणमुळे या दोघांच्या विशेष चर्चा रंगल्या. कधीकाळी या तिघांमध्ये प्रेमाचा त्रिकोण तयार झाला होता. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगसोबत लग्न केलं. तर रणबीर कपूर सध्या आलिया भट्टला डेट करत आहे. मात्र रणबीर-दीपिका -रणवीर या तिघांमधील तेढ अद्यापही तशीच असल्याचं पाहायला मिळतंय. असं असलं तरी रणवीर आणि रणबीरने एकत्र स्क्रीन शेअर करावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा काही अंशी पूर्ण होणार आहे. रणवीर आणि रणबीर लवकरच एकत्र झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडमधील हे दोन्ही सुपरस्टार कोणत्याही चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार नसून एका जाहिरातीसाठी एकत्र येणार आहे. ही एका शितपेयाची जाहिरात आहे. यासाठी या ब्रॅण्डने दोघांशी संपर्कही साधला आहे. मात्र अद्यापतरी या दोघांकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही.

दरम्यान, रणवीर आधीपासूनच या ब्रॅण्डचा सदिच्छादूत आहे. परंतु ही कंपनी रणबीरला रणवीरसोबत गेस्ट रोलमध्ये आणू इच्छिते. इतकंच नाही तर यासाठी कंपनीने रणबीरला मोठी रक्कमही ऑफर केल्याचं सांगण्यात येत आहे. रणबीर हा दीपिकाचा एक्स – बॉयफ्रेंड आहे,तर रणवीर आता दीपिकाचा पती त्यामुळे या दोघांच्या एकत्र येण्यामुळे कंपनीला फायदा होईल, असं कंपनीचं मत आहे. मात्र रणवीर आणि रणबीर एकत्र झळकणार की नाही याविषयी अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 8:47 am

Web Title: ranbir kapoor and ranveer singh will soon be sharing screen know when
Next Stories
1 मोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका
2 मिर्झापूर – २ ला हिरवा कंदील
3 टेंभुर्णीत बारावी परीक्षेला ‘आर्ची’ सामोरी जाते तेव्हा..
Just Now!
X