६९ वर्षीय एनएस राजप्पन गेल्या सहा वर्षांपासून एका मिशनवर आहेत. गुडघ्याच्या खाली पॅरालाईज असलेले हे गृहस्थ गेल्या सहा वर्षांपासून दररोज केरळमधील वेम्बनाद तलावाची साफसफाई करत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे राजप्पन स्वत:च्या पैशांनी बोट भाड्याने घेतात व तलावामधील प्लास्टिक वेचतात. त्यांच्या या समाजसेवेला अभिनेता रणदीप हुड्डा याने सलाम केला आहे. याला म्हणतात खरी देशभक्ती असं म्हणत त्याने राजप्पन यांची स्तुती केली आहे.

अवश्य पाहा – “पत्नीचा मार खाऊन ४८ कोटी रुपये गमावल्यासारखं वाटलं”; अभिनेत्याचा कोर्टात अजब दावा

अवश्य पाहा – “केलेल्या पापांची याच जन्मात फळं भोगावी लागतील”; अभिनेत्याने केली सलमानवर टीका

“कोणी व्यक्ती देशाप्रती आपलं प्रेम कसं व्यक्त करु शकतो? कदाचित याच प्रकारे. प्रेम हे आपल्या कामातून प्रतिबिंबित होतं. शब्दांमधून किंवा सोशल मीडियाद्वारे नाही. राजप्पन यांना सलाम. हा आहे देशभक्तीचा खरा चेहरा.” अशा आशयाचं ट्विट करुन रणदीपने राजप्पन यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

द न्यूज मिनिटने दिलेल्या वृत्तानुसार राजप्पन संपूर्ण बोट प्लास्टिकने भरल्याशिवाय किनाऱ्यावर येत नाही. ते आपल्या लहानश्या बोटीत दररोज किमान किलो प्लास्टिक कचरा गोळा करतात. त्यांना बोटिसाठी दररोज १२ रुपये भाडं द्याव लागतं. राजप्पन यांनी संपूर्ण वेम्बनाद तलाव स्वच्छ करण्याचा निश्चय केला आहे. आणि हे तलाव प्लास्टिक फ्री झाल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही.