News Flash

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत चिमुकल्या पाहुण्याचं होणार आगमन

कुणीतरी येणार गं

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते असं म्हणतात. मातृत्वासारखं दुसरं सुख नाही. स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत चिमुकल्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. आईचं सुख मिळवण्यासाठी नेहमी धडपडणारी दीपा आता आई होणार आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतल्या या सुखद वळणाविषयी सांगताना दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, “दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट शक्य होत गेली. आता तर बाळाची चाहूल लागली आहे. त्यामुळे दीपा खूपच आनंदात आहे. आमच्या सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. यापुढील भाग शूट करण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत.”

आणखी वाचा- “वडिलांशी खोटं बोलून केली ही गोष्ट”; जान्हवी कपूरने केला खुलासा

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतलं हे वळण उत्कंठा वाढवणारं असलं तरी दीपाची ही गूड न्यूज इनामदार कुटुंबात कश्या पद्धतीने स्वीकारली जाणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 10:02 am

Web Title: rang majha vegla marathi serial upcoming episode updates ssv 92
Next Stories
1 ‘…बऱ्याच काळानंतर’; कतरिनाने शेअर केला खास व्हिडीओ
2 टेलिव्हिजनवरील एका आईची इमेज ही बदलली पाहिजे – प्रिया मराठे
3 अमिताभ बच्चन यांनी केली रिटायरमेंटची घोषणा? म्हणाले, “मी सर्वांची माफी मागतो पण…”
Just Now!
X