25 February 2021

News Flash

प्रतिक्षा संपली! ’83’ या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

जाणून घ्या प्रदर्शनाची तारीख

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाले आहेत. दरम्यान ’83’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

’83’ हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. ’83 चित्रपट ४ जून २०२१ रोजी हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच चित्रपटगृहांमध्ये भेटूया’ या आशयाचे कॅप्शन रणवीरने पोस्टर शेअर करत दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

या पूर्वी ’83’ हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:21 pm

Web Title: ranveer singh 83 movie release date avb 95
Next Stories
1 मिसवर्ल्ड स्पर्धेत घडला ‘तो’ धक्कादायक प्रसंग; प्रियांका म्हणाली…
2 पत्नीसोबतचा ‘तो’ व्हिडिओ शेअर केल्याने विवेक ओबेरॉय अडचणीत, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
3 दहापेक्षा अधिक मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज
Just Now!
X