30 March 2020

News Flash

वयाच्या 12व्या वर्षी ठेवले होते शरीरसंबंध; रणवीर सिंगचा खुलासा

रणवीरने या मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला.

रणवीर सिंग

वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याची कबुली अभिनेता रणवीर सिंगने दिली आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत कंडोमच्या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने हा खुलासा केला. १२ वर्षांचा असताना मी केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते, असं तो म्हणाला.

”मी प्रत्येक गोष्ट खूप कमी वयात केली. मी काळाच्या पुढे होतो असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. मी शाळेत असताना माझ्या मित्रांचे आईवडील मला म्हणायचे की, तू आमच्या मुलांना बिघडवत आहेस. माझ्या वयाच्या मुलांना सेक्सविषयी फार काही माहीत नव्हतं. त्यामुळे मी यात खूप एक्स्पर्ट झालो असं मला वाटायला लागलं होतं,” असं रणवीरने सांगितलं.

View this post on Instagram

Me looking at you eating carbs like

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

आणखी वाचा : ‘सेक्रेड गेम्स२’मुळे या व्यक्तीच्या डोक्याला झालाय ताप; ‘नेटफ्लिक्स’नेही मागितली माफी

रणवीरने या मुलाखतीत कंडोमची जाहिरात करण्यामागचं कारणदेखील सांगितलं. तो म्हणाला, ”मी एकदा कारमध्ये बसलो होतो. त्यावेळी समोर असलेल्या होर्डिंगवरील विविध जाहिराती पाहत होतो. त्यावर विविध विक्रीच्या वस्तू दिसल्या पण कंडोमची जाहिरात कुठेच नव्हती. मग मला समजलं की आपल्याकडे कंडोमच्या ज्या जाहिराती आहेत त्या अत्यंत प्रक्षोभक आहेत. सेक्सची फक्त हीच एक संकल्पना होऊ शकत नाही. पण आता समाजाचा या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यामुळे आता याविषयी मोकळेपणाने आपण बोलू शकतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 4:31 pm

Web Title: ranveer singh confessed that he lost his virginity at the age of 12 ssv 92
Next Stories
1 Teaser : ‘इतिहास हमसे लिखा जाएगा’; चिरंजीवी व बिग बी यांचा बिग बजेट चित्रपट
2 ‘सेक्रेड गेम्स२’मुळे या व्यक्तीच्या डोक्याला झालाय ताप; ‘नेटफ्लिक्स’नेही मागितली माफी
3 अभिनेत्यासोबत लीप लॉक सीनमुळे चर्चेत आला होता रणदीप हुड्डा
Just Now!
X