बॉलिवूडमधील कायम चर्चेत असलेलं कपल म्हणजे रणवीप सिंह आणि दीपिका पदूकोण. रणवीर आणि दीपिकाची केमिस्ट्री अनेकदा सोशल मीडियावरदेखील पाहायला मिळते. नुकतच रणवीरने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवलं होतं. या सेशनमध्ये रणवीरच्या अनेक चाहत्यांनी त्याला मजेशीर प्रश्न विचारले. तर रणवीरनेदेखील चाहत्यांच्या प्रश्नाला त्याच्या हटके अंदाजात उत्तर दिली आहेत. या सेशनमध्ये दीपिकाने देखील रणवीरला एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला रणवीरने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये दीपिका पदूकोणने रणवीरला ” तू घरी कधी येत आहे?”असा प्रश्न विचारला होता. यावर रणवीरने धमाल उत्तर दिलंय. “जेवण गरम करून ठेव बेबी, मी घरी पोहचतोच आहे” असं उत्तर दिलंय. बायकोला रणवीरने दिलेलं हे उत्तर चाहत्यांच्या चांगलच पसंतीस पडलंय.

हे देखील वाचा: ‘बिग बॉस १५’साठी सलमान खानची फी माहितेय का?, मानधन ऐकून डोळे चक्रावतील

ranveer-singh-deepika-padukone
(Photo-Instagram@ranveersingh)

रणवीरने अनेक चाहत्यांच्या प्रश्नाला भन्नाट उत्तरं दिली आहेत. या सेशनमध्ये रणवीरला एका चाहत्याने “तुझ्या पत्नीसाठी एक शब्द काय?” असा प्रश्न विचारला होता. यावर रणवीरने “क्वीन” असं उत्तर दिलंय. रणवीर आणि दीपिकाचा रोमॅण्टिक अंदाज त्यांच्या चाहत्यांना कायम पसंतीस पडतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीर लवकरच ’83’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात रणवीरसोबत दीपिकादेखल मुख्य भूमिकेत झळकेल. तर दीपिका ‘फायटर’, ‘पठाण’, ‘द इंटर्न’ अशा अनेक सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकेल.