06 March 2021

News Flash

जगातील फक्त तीनच सेलिब्रीटींनी परिधान केलेल्या या कपड्याची किंमत ऐकून व्हाल थक्क !

आता पुन्हा एकदा रणवीर कपूर त्याच्या अतरंगी फॅशनसाठी चर्चेत आला आहे.

रणवीर त्यानं परिधान केलेलं 'वर्साची' या आलिशान ब्रँडचं शर्ट, त्यावरील असलेल्या विचित्र प्रिंट आणि किंमतीमुळे चर्चेत आला आहे.

रणवीर सिंग हा अभिनयाबरोबरच त्याच्या ‘अतरंगी’ फॅशनसाठीही ओळखला जातो. आतापर्यंत कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीनं त्याच्यासारखी स्टाईल करण्याचं धाडस केलं नसणार हे नक्की. अनेकदा तर त्याचा पेहराव सोशल मीडियावर थट्टेचा विषयही ठरला आहे, पण फॅशन क्रिटीक्सच्या टीका रणवीर फारशा मनावर घेत नाही. मला जे आवडतं आणि जे योग्य वाटतं तेच मी करणार अशा मताचा तो आहे.

आता पुन्हा एकदा रणवीर कपूर त्याच्या अतरंगी फॅशनसाठी चर्चेत आला आहे. रणवीर त्यानं परिधान केलेलं ‘वर्साची’ या आलिशान ब्रँडचं शर्ट, त्यावरील असलेल्या विचित्र प्रिंट आणि किंमतीमुळे चर्चेत आला आहे. या ब्रँडनं तयार केलेले विशिष्ट प्रिंटचे हे कपडे काही सेलिब्रिटींच्या पसंतीस पडले नाही. पण, रणवीरला मात्र ते भलतेच आवडले. आतापर्यंत जगभरातील तीनच सेलिब्रिटींनी हे नव्या कलेक्शनचे कपडे परिधान केले आहेत आणि त्यात रणवीरचा समावेश आहे.

वाईल्ड प्रिंट असलेल्या या सिल्क शर्टची किंमत ही अडीच लाखांहून अधिक असल्याचं समजत आहे. अनेकांना हा शर्ट अजिबात आवडला नसला तरी हटके फॅशनचा चाहता असलेल्या रणवीरला मात्र ते सर्वात जास्त आवडले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 5:13 pm

Web Title: ranveer singh wore an exclusive range by versace
Next Stories
1 जे सत्य आहे ते कायम सत्यच राहणार- नाना पाटेकर
2 हा पब्लिसिटी स्टंट; तनुश्रीच्या आरोपांवर निर्माते सामी सिद्दीकींची पोलिसांना माहिती
3 तनुश्री-नाना वादात विनाकारण नाव गोवल्या गेलेल्या अक्षयची पोलिसांकडे धाव
Just Now!
X