26 January 2021

News Flash

रवी जाधवच्या न्यूडला सेन्सॉरकडून ‘अ’ प्रमाणपत्र, एकही कट नाही

दिग्दर्शक रवी जाधवच्या न्यूड या चित्रपटाला अखेर सेन्सॉरकडून प्रमाणित करण्यात आले आहे. कोणत्याही कटशिवाय सेन्सॉरने अ प्रमाणपत्र देत या चित्रपटाला प्रमाणित केले आहे. गोव्यात पार

दिग्दर्शक रवी जाधव, 'न्यूड' चित्रपट

दिग्दर्शक रवी जाधवच्या न्यूड या चित्रपटाला अखेर सेन्सॉरकडून प्रमाणित करण्यात आले आहे. कोणत्याही कटशिवाय सेन्सॉरने अ प्रमाणपत्र देत या चित्रपटाला प्रमाणित केले आहे. गोव्यात पार पडलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (IFFI) हा चित्रपट वगळण्यात आला होता. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून ‘न्यूड’ हा चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयावरून बराच वाद निर्माण झाला होता.

मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार आणि वेगळे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये रवी जाधवचे नाव आवर्जून घेतले जाते. त्याचा आगामी ‘न्यूड’ हा असाच एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा मुंबईत जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे. मात्र इफ्फीतून हा चित्रपट वगळण्यात आल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. इफ्फीच्या इंडियन पॅनारोमा सेक्शनच्या १३ परीक्षकांनी मिळून २६ चित्रपटांपैकी ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट निवडले होते. रवी जाधवच्या ‘न्यूड’ला ओपनिंग चित्रपटाचा बहुमानही मिळाला होता. रवी जाधवने यासंदर्भात फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 5:52 pm

Web Title: ravi jadhav nude movie get a certificate by cbfc without a single cut
Next Stories
1 अल्ता लावून कतरिना पार्टीला जाते तेव्हा..
2 आयआयएममध्ये ‘बाहुबली- २’ ची केस स्टडी
3 उर्मिला- आदिनाथ कोठारेला कन्यारत्न
Just Now!
X