अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार दाखल झाली आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रियावर आर्थिक गैरव्यवहार आणि सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप केले आहेत. सध्या ईडी आणि सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र या आरोपांमुळे सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान रिया आणि निर्माता महेश भट्ट यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. “एक दोन वर्षानंतर तुम्ही एकमेकांना मारण्याचा विचार करता”, अशी प्रतिक्रिया रियाने या व्हिडीओमध्ये दिली आहे.
अवश्य पाहा – कुंडली न जुळल्यानं अभिनेत्रीने मोडलं लग्न
रियाने २०१८मध्ये ‘जलेबी’ नामक एका चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रमोशदरम्यान रियाने प्रेम आणि नातेसंबंध याबाबत आपले विचार व्यक्त केले होते. “एक दोन वर्षानंतर अशी वेळ येते जेव्हा तुम्ही एकमेकांना मारुन टाकण्याचा विचार करु लागता. तुम्हाला सर्वकाही बदलायचं असतं. खरं तर ही एक सामान्य विचारसरणी आहे. विशिष्ट काळानंतर असे विचार येतातच. पण आता माझे विचार बदलले आहेत. प्रेमाबद्दलचा माझा दृष्टीकोण आता पूर्णपणे बदलला आहे. कदाचित आता आयुष्यभर मी एकटीच राहाणं पसंत करेन.” अशा आशयाचे विचार या व्हिडीओमध्ये रियाने मांडले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत महेश भट्ट देखील आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 22, 2020 12:24 pm