News Flash

‘सीता भी यहाँ बदनाम हुई’; महेश भट्टवरून ट्रोल करणाऱ्यांना रियाचं सडेतोड उत्तर

रिया आणि महेश भट्ट यांची तुलना अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीनशी करत तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का असा सवाल काही युजर्सनी केला होता.

महेश भट्ट, रिया चक्रवर्ती

प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चांगलंच महागात पडलं. महेश भट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर केल्यानंतर नेटीझन्सनी रिया आणि महेश भट्ट यांना ट्रोल केलं. इतकंच नव्हे तर अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्याशीही त्यांची तुलना केली. यावर आणखी एक फोटो शेअर करत रियाने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे? इथे सीतेलासुद्धा बदनाम करण्यात आलं. ट्रोल करणाऱ्यांनो तुम्हाला हे माहित आहे का, की तुम्ही जसे आहात तसंच तुम्हाला जग दिसतं,’ असं कॅप्शन देत रियाने महेश भट्ट यांच्यासोबत आणखी एक फोटो शेअर केला.

महेश भट्ट यांच्या आगामी ‘जलेबी’ या चित्रपटात रिया मुख्य भूमिका साकारत आहे. रिया आणि महेश भट्ट यांची तुलना अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीनशी करत तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का असा सवाल काही युजर्सनी केला होता. सध्या ‘बिग बॉस १२’मुळे अनुप- जसलीन ही जोडी खूप चर्चेत आहे. दोघांच्या वयातील ३७ वर्षांच्या अंतरामुळे ही जोडी चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 2:44 pm

Web Title: rhea chakraborty has a befitting reply for trolls shares another pic with mahesh bhatt
Next Stories
1 घटस्फोटानंतर मलायका म्हणते, आता मी शांततापूर्ण जीवन जगतेय
2 Happy Birthday Prem Chopra : प्रेम नाम है मेरा…!
3 छोटा पडदा, मोठा फायदा
Just Now!
X