News Flash

रिचा चढ्ढाच्या सडेतोड उत्तरानंतर नेटकऱ्याने अभिनेत्रीला केलं ब्लॉक

रिचाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या विषयी माहिती दिली आहे.

रिचाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या विषयी माहिती दिली आहे. (Photo Credit : Richa Chadha Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर रिचा नेहमीच तिचं मत मांडताना दिसते. तर, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, रिचाने सोशल मीडियावर नुकतेच एका ट्रोर्लला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर रिचाने एक स्क्रिनशॉर्ट देखील शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

रिचाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एका ट्रोलर्लला सडेतोड उत्तर दिल्याबद्दल सांगितले आहे. “नुकतचं एका ट्रोलला उत्तर दिलं, त्यानंतर त्याने ती कमेंट डीलीट केली, पळून गेला आणि त्याने मला ब्लॉक देखील केले! पुढच्या वेळी स्क्रीनशॉट घ्यायचा हे लक्षात ठेवेन. म्हणजे मी त्या व्यक्तीचं नाव सगळ्यांना दाखवू शकेन”, असा मेसेज तिने इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केला आहे.

richa chadha replies to an abusive troll

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

रिचा ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. रिचाचा ‘मॅडम चिफ मिनिस्टर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रिचाने मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 10:13 am

Web Title: richa chadha replies to an abusive troll who later deleted the comment and blocked her dcp 98
Next Stories
1 “पावसाला एक अक्कल नाही…जास्त पडून तुंबई करतो”; केदार शिंदे यांचा बीएमसीला टोला
2 अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमात भूमि पेडणेकर झळकणार, शेअर केला खास फोटो
3 मुंबईत कोसळता पाऊस पाहून रोमॅण्टिक झाली कंगना रनौत; म्हणाली, “जो माझ्यासाठी बनलाय तो….”
Just Now!
X