22 April 2019

News Flash

रितेशने शोधला अजयचा कुत्रा….नेटीझन्सनी केली ‘टोटल धमाल’

लवकरच रितेश-अजयचा टोटल धमाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रितेश देशमुखने सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. टिकटॉकच्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा चालू रिक्षावर रूबाबात उभा असल्याचे दिसत आहे. या रूबाबात उभा असलेल्या कुत्र्याला पाहून रितेशला अजयची आठवण झाली आहे. रितेशने त्याला अजयचा कुत्रा असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. रिक्षाच्या वर उभा असलेल्या कुत्र्याला पाहून रितेशला अजयच्या ‘फुल और कांटे’ या चित्रपटातील अजयच्या दोन चालत्या बाईकवरील ‘त्या’ आयकॉनिक सीनची आठवण झाली. मग काय रितेशने या व्हिडिओत अजयला टॅग करत, ‘मी आत्ताच तुझा कुत्रा पाहिला…’, असे लिहिले.

रितेशच्या या मजेद्दार व्हिडीओनंतर शांत बसतो तो अजय देवगन कसला. अजयने त्याला प्रतित्तुर दिले आहे. अजयने एका पक्षाचा फोटो शेअर करत, ‘होय, ज्याप्रमाणे हा पक्षी माझा आहे…,’असे लिहिले. या फोटोतला पक्षीही अजयच्या ‘फुल और कांटे’ स्टाईलने बसलेला दिसतोय. रितेश आणि अजय यांच्या सोशल मीडियावरील मजेदार संवादानंतर नेटीझन्सनेही मजेदार मिम्स आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

लवकरच रितेश-अजयचा टोटल धमाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टोटल धमाल या चित्रपचामध्ये माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशी तगडी स्टारकास्ट असून आता हा चित्रपट कसा असेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

First Published on February 7, 2019 1:49 pm

Web Title: riteish deshmukh ajay devgn share a joke on twitter