News Flash

रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, “कठीण काळात एकत्र येणं गरजेचं..मदत हवी असल्यास..”

रियाने सोशल मीडियावरून केलं आवाहन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात कारवाई झाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती बॉलिवूडपासून दूर गेली आहे. सोशल मीडियावर देखील रिया फारशी सक्रिय नसते. मात्र नुकतीच रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत मदतीचा हात पुढे केला आहे. सध्याकरोनाच्या काळात अनेक सेलिब्रिटी गरजुंच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. कुणी रुग्णांना बेड मिळावा यासाठी प्रयत्न करतंय तर कुणी ऑक्सिनजन पुरवठ्यासाठी. यातच आता रियादेखील मदतीसाठी पुढे आली आहे.

रियाने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हंटलं आहे, ” कठीण काळात एकत्र येण्याची गरज आहे. तुम्हाला शक्य त्यांना मदत करा, छोटी मदत किंवा मोठी मदत..मदत ही मदत असते. मी जर कुणाची मदत करू शकत असेल तर मला डायरेक्ट मेजेस करा. मी शक्य ते करेन, काळजी घ्या, थोडी दया दाखवा.” असं म्हणत तिने मदतीचा हात पुढे केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर रियाने अगदी मोजक्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या प्रकरणानंतर रियाच्या मनावर मोठा आघात झाल्याचं तिने म्हंटलं होतं.

रिया चक्रवर्तीने ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘सोनली केबल’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण ‘जलेबी’ या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली. आता ती लवकरच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘चेहरे’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 8:30 pm

Web Title: riya chakrvarty post insta story said help people and dm for any help she can kpw 89
Next Stories
1 ‘आता खरी देशभक्ती दाखवायची वेळ आली..’,सोनू सूदने केलं ट्वीट
2 मुंबई पोलिसांच्या ‘त्या’ भन्नाट उत्तरावर आर माधवनची शाबासकी, म्हणाला, ” त्याला नक्कीच..”
3 सुनिधी चौहान आणि तिच्या पतीचं पटेना? सुनिधी यावर म्हणते,”….
Just Now!
X