News Flash

रोहनप्रीतने नेहाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाला ‘मी वचन देतो की…’

रोहनप्रीतने हा फोटो शेअर करत त्याला नेहाचा पती असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

नेहा कक्कर आज तिचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. (Photo Credit : Rohanpreet Singh Instagram)

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्करचा आज ३३वा वाढदिवस आहे. नेहा आज तिच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर नेहाचे चाहते नेहाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे नेहाचा पती रोहनप्रीतच्या पोस्टने वेधले आहे.

रोहनप्रीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेहासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहाने हिरव्या रंगाचा टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. तर रोहनप्रीतने टी-शर्ट परिधान केला आहे. त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohanpreet Singh (@rohanpreetsingh)

“माझी राणी माझं प्रेम आणि द नेहा कक्कर. आज तुझा वाढदिवस आहे. या निमित्ताने मला तुला सांगायचे आहे की, मी आता पर्यंत तुझी जेवढी काळजी घेतली, त्याहुन जास्त काळजी मी येणाऱ्या काळात घेईन…प्रत्येक आरशात मला तू सुंदर दिसते. मी वचन देतो की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन…मला तुझा पती असल्याचा अभिमान आहे. मी वचन देतो की माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट मी तुझ्यावर प्रेम करेन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझं प्रेम,” असे कॅप्शन देत रोहनप्रीतने तो फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : शाहरुखच्या गाडीभोवती लोक गोळा झाले की सुहाना रडायची!

दरम्यान, नेहा २००५ मध्ये ‘इंडियन आयडल’ची स्पर्धक होती. सध्या नेहा ही ‘इंडियन आयडल १२’ची परिक्षक आहे. गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी रोहनप्रीत सिंग आणि नेहाने लग्न केले. नेहा रोहनप्रीतपेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 4:35 pm

Web Title: rohanpreet singhs romantic birthday wish for wife neha kakkar is husband goals dcp 98
Next Stories
1 दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी सायरा बानो यांनी दिली माहिती, म्हणाल्या…
2 VIDEO: सनी लिओनीने शेअर केला ‘हिडेन बर्थडे व्हिडीओ’; सोशल मीडियावर व्हायरल
3 इंडियन आयडलच्या एका भागासाठी नेहा कक्कर घेते ‘इतके’ मानधन
Just Now!
X