२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, भारतीय संघात फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात रोहित आणि विराटमध्ये मतभेद झाल्याचंही वृत्त समोर आलं होतं. रोहित शर्मानं काही दिवसांपूर्वी कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावरून अनफॉलो केल्यानंतर आता त्याने विराटची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मालाही अनफॉलो केल्याचं वृत्त आहे.
‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, रोहितने इन्स्टाग्रामवर अनुष्काला अनफॉलो केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्याने विराटलाही अनफॉलो केलं होतं. रोहितने विराटला अनफॉलो करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तर दुसरीकडे विराट अजूनही इन्स्टाग्रामवर रोहित व त्याची पत्नी रितिका सजदेहला फॉलो करत आहे.

विश्वचषकानंतर रोहित संघाला सोडून आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हिच्यासमवेत मुंबईत दाखल होता. तेव्हापासून रोहित आणि विराट यांच्यात वितुष्ट असल्याची चर्चा होती.