News Flash

वाढदिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट, ‘RRR’मधील लूक प्रदर्शित

या चित्रपटात राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट हे कलाकार देखील झळकणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’ चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. आज या चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

आज २० मे रोजी सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आरआरआर या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. राजमौली यांनी ट्विटर अकाऊंटवर ज्युनिअर एनटीआरचा लूक शेअर केला असून सध्या चर्चेत आहे.

आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचं खरं नाव माहितीये का?

‘आरआरआर’ चित्रपटामध्ये ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारणार आहे. या पूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरवरुन चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्याचे दिसत होते. तसेच चित्रपटाची कथा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील अलुरी सिथारामराजु व कोमराम भीम या स्वातंत्र्यवीरांवर आधारित आहे.

ज्युनिअर एनटीआर सोबत राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिस हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाती तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 12:13 pm

Web Title: rrr jr ntrs birthday gift to fans is intense new look as komaram bheem avb 95
Next Stories
1 ‘IPL बंद झाल्याचा राग इंडियन आयडलवर काढतात’, आदित्य नारायणने व्यक्त केली खंत
2 जवळच्या व्यक्तीला गमावूनही श्रेया बुगडे करतीये प्रेक्षकांचं मनोरंजन
3 मुलीच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलांना सोडले? म्हणणाऱ्यांना माहीने दिले सडेतोड उत्तर
Just Now!
X