News Flash

“वडिलांचे पैसे वाया घालवतेय”, ‘यामुळे’ सारा तेंडुलकर झाली ट्रोल

ट्रोलरला सारा म्हणाली...

(photo-instagram@saratendulka)

भारताचा माजी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे अनेक चाहते आहे . साराबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण धडपडतात. सोशल मीडियावरही तिचे बरेच फॅन्स आहेत. इन्स्टाग्रावरही साराचे बारा लाख फॉलोअर्स आहेत.

सारा लंडनमध्ये तिचं शिक्षण घेतेय. सचिन तेंडुलकरची मुलगी असल्याने साराच्या पोस्टवर नेटकऱ्यांचं चांगलच लक्ष असतं. त्यामुळे तिला काहीवेळा ट्रोलही केलं जातं. अर्थातच ट्रोलर्सना कसं उत्तर द्यायचं हे साराला चांगलंच ठाऊक आहे. नुकतच साराला एका युजरने ट्रोल केलं आहे. मात्र सारानेदेखील तिला सडेतोड उत्तर दिलं आहे.

साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत फक्त एक कॉफीचा मग दिसत असून साराने “ब्लू टोकाय कॉफी..जीव वाचवते” असं कॅप्शन दिलं होतं. यात सारा कॉफी पिण्याचा आनंद लुटत असल्याचं कळून येतंय. मात्र साराच्या या पोस्टला एका युजरने कमेंट केली आहे. ” वडिलांचा पैसा वाया घालवतेय.”असं म्हणत युजरने तिल ट्रोल केलंय. यावर साराने तिला उत्तर देत म्हंटलं आहे.” कॅफेनवर खर्च केलेला पैसा म्हणजे वाया घालवणं नाही तर योग्य खर्च करणं आहे…LOL” असं उत्तर साराने तिला दिलं आहे. साराने या युजरला दिलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉटही तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केले आहेत.

दरम्यान कॉफीसाठी वडिलांचा पैसा खर्च कर म्हणाऱ्या युजरने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवरही निशाणा साधला आहे. फक्त 20 लाखात अर्जुनला मुंबई इंडियन टीमने घेतलंय म्हणत तिने अर्जुनची थट्टा केली आहे. २०२१ च्या सय्यद मुश्ताक अली टी -२० करंडक स्पर्धेत अर्जुनने पदार्पण केलं होत. यात तो फक्त दोन सामने खेळला होता.

‘या’ अभिनेत्याला अनन्या पांडेने केलं होतं पहिलं किस, म्हणाली “आतापर्यंतचं…”

याआधीदेखल याच युजरने साराला ट्रोल केलं होतं. साराने अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियनच्या जर्सीसाठी फोटोशूट केल्याची एक पोस्ट शेअर केली होती. यावर “सर्वात स्वस्त मुलगा” अशा आशयाची  कमेंट केली होती. साराने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ही कमेंट दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 8:46 pm

Web Title: sachin tendulkar daughter sara tendulkar trolled women accuse her of losing her fathers money kpw 89
Next Stories
1 वडिलांची कविता शेअर करत अमिताभ बच्चन चाहत्यांना म्हणाले..
2 अर्जुन कपूरसोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत सोनम म्हणाली, “आय मीस यू”
3 “ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे”, भरत जाधवचं चाहत्यांना आवाहन
Just Now!
X