08 April 2020

News Flash

सेक्रेड गेम्स २ : ‘त्या’ अभिनयामुळे स्मिताने मिळविली सैफची शाबासकी

स्मिताच्या अभिनयाची भुरळ सैफ अली खानलादेखील पडली आहे

नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकीच प्रसिद्ध असलेली ‘सेक्रेड गेम्स२’ ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नावाजलेली चेहरे झळकले आहेत. विशेष म्हणजे नुकतीच प्रदर्शित झालेली ही सीरिज प्रेक्षकांचं मन जिंकत असून यामध्ये काम केलेले मराठी कलाकारही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहेत. यामध्ये अभिनेत्री अमृता सुभाष आणि स्मिता तांबे या दोन मराठमोळ्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. त्यातच स्मिता तांबे हिचा अभिनय केवळ प्रेक्षकांच्याच पसंतीत उतरत नसून तिच्या अभिनयाची भुरळ अभिनेता सैफ अली खानलादेखील पडली आहे. त्यामुळेच त्याने तिला शाबासकीची थाप दिली आहे.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्मिताने सायबर फॉरेन्सिक एक्सपर्टची भूमिका साकारली आहे. रमा असं तिच्या व्यक्तीरेखेचं नाव असून ती न्यु- क्लिअर बॉम्बची साखळी शोधण्यासाठी सिनिअर इन्स्पेक्टर सरताज सिंगला मदत करणारी करताना दिसत आहे. यावेळी तिने केलेला अभिनय पाहून सैफ प्रचंड खूश झाला असून त्याने तिला कॉम्पलिमेंट दिली आहे. तू प्रचंड इंटेन्स एक्टरेस आहेस असं सैफ तिला म्हणाला.

“मी गेल्या अनेक वर्षांपासून सैफ अली खानची चाहती आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. ते खूप मनमिळावू स्वभावाचे आहेत. सीन सुरू नसताना ते खूप चेष्टा-मस्करी करत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला, की मग भूमिका वठवताना ते एकदम गंभीर होतात. चित्रीकरणावेळी माझे काम पाहून तू खूप इंटेन्स एक्टरेस आहेस ही त्यांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे,” असं स्मिता म्हणाली.
पुढे ती म्हणते, स्मिता साकारत असलेली ‘रमा’, मुंबईतल्या शिवडीमध्ये कुटुंबासमवेत राहणारी, मुळची विदर्भातली दाखवली आहे. आपल्या कामाबद्दल प्रचंड निष्ठावान! अहोरात्र झोकून देऊन काम करणारी! २६/११ च्या हल्ल्यानंतर देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी ती पोलिसात भरती होते. मुंबईवर हल्ला करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचे गुप्त संदेश ‘डिकोड’ करताना ती दाखवली आ”हे.

दरम्यान, ‘सिक्रेड गेम्स’ ही सीरिज केवळ देशातच नाही तर विदेशातही तितकीच लोकप्रिय आहे. १५ ऑगस्ट रोजी या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये जुन्या कलाकारांसह अनेक नव्या कलाकारांचादेखील सहभाग आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 2:14 pm

Web Title: sacred games 2 saif ali khan says well done to smita tambe ssj 93
Next Stories
1 वाढदिवसानिमित्त सैफची चाहत्यांना खास भेट, ‘लाल कप्तान’चा टीझर प्रदर्शित
2 Happy Birthday Saif Ali Khan : केवळ ‘या’ अटीवर करिनाने बांधली सैफशी लग्नगाठ
3 “सरकारला कधी जाग येणार?”, ‘ये रे ये रे पैसा २’ चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने प्रसाद ओकचा संताप
Just Now!
X