News Flash

‘सडक २’चे पोस्ट प्रदर्शित होताच महेश भट्ट झाले ट्रोल

नेटकऱ्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे

दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सडक’ हा बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या हिट चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी होते. ‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. नुकताच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. पण नेटकऱ्यांना ते फारसे आवडले नसल्याचे दिसत आहे. त्यांनी महेश भट्ट यांना ट्रोल करण्यात सुरुवात केली आहे.

महेश भट्ट यांनी ट्विटरवर ‘सडक २’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्यांनी हे पोस्टर शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. पण नेटकऱ्यांना ते आवडले नाही. त्यांनी महेश भट्ट यांना चांगलेच सुनावले आहे. अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे जून फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी दोघांनाही सुनावले होते. त्यामुळे नेटकरी आता महेश भट्ट यांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत असल्याचे म्हटले जात आहे.

‘सडक’ चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:07 pm

Web Title: sadak 2 poster netizens boycott mahesh bhatts film ahead of its premiere avb 95
Next Stories
1 “त्यांनी आंम्हाला विचारलं सुद्धा नाही”; हॉटस्टारच्या कॉन्फरन्सवर अभिनेत्री नाराज
2 ‘शुभारंभाचा प्रयोग’? स्पृहाने शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नाट्यरसिक संभ्रमात
3 अदा शर्माने साधला घराणेशाहीवर निशाणा; सांगितले स्टार किड्स नसण्याचे फायदे
Just Now!
X