बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अनेकदा धार्मिक भावना दुखावल्याची टीका करण्यात आली आहे. तसचं सैफसह अनेकदा करीना कपूर तसचं सारा अली खानला त्यांच्या धर्मावरून ट्रोल करण्यात आलं आहे. सैफ आणि करीनाला त्यांच्या मुलांच्या नावावरूही ट्रोल व्हावं लागलं होतं. वर्षाच्या सुरुवातीलाच आलेली सैफची ‘तांडव’ ही वेब सीरिज देखील भोवऱ्यात सापडली होती. या सीरिजमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सैफवर टीका करण्यात आली होती. तर सैफचा आगामी सिनेमा ‘भूत पोलीस’च्या पोस्टरवरूनही धार्मिक वाद निर्माण झाला होता.

लवकरच सैफ ‘भूत पोलीस’ या सिनेमात झळकणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना सैफने तो या सिनेमातील भूमिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही नास्तिक असल्याचा खुलासा केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, ” खऱ्या आयुष्यात मी नास्तिक आहे. याबाबतीत मी धर्मनिरपेक्ष आहे.  धर्मासारख्या गोष्टीमुळे माझी चिंता वाढते कारण त्यामुळे नंतरच्या जीवनावर प्रभाव पडतो . मला वाटतं धर्मामुळे माझा देव, तुमचा देव, कुणाचा देव चांगला आणि योग्य अशा समस्या उद्भवू लागतात. मी प्रार्थना करतो आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करतो. मी जास्त आध्यात्मिक आहे.” असं सैफ म्हणाला.

हे देखील वाचा: “दर तीन मिनिटांनी खायची पण मला एकदाही नाही विचारलं”; बिग बी अमिताभ बच्चन यांनी दीपिकाची केली तक्रार

हे देखील वाचा: “बाळाचे वडील कोण हे वडिलांना ठाऊक आहे”, ‘त्या’ प्रश्नावर नुसरत जहाँ यांचं उत्तर

या मुलाखतीत सैफने पुनर्जन्मावरही त्याचं मत मांडलं, तो म्हणाला, ” हे खूप दुख:द आहे की एकदा तुमचा मृत्यू झाला की सगळं संपलं. त्यानंतर मग काही होवू शकत नाही” यावेळी सैफने धर्माच्या नियमांचा त्याच्यावर फारसा प्रभाव पडत नसल्याचा खुलासा केला आहे.

सैफचा ‘भूत पोलीस’ हा सिनेमा १० सप्टेंबरला डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या शिवाय सैफ ‘आदिपुरुष’ या सिनेमात रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे.