‘सैराट’मुळे स्टारडम प्राप्त झालेल्या ‘आर्ची’चा अर्थात रिंकू राजगुरूचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्रपटात एका खेडेगावातील राजकीय नेत्याच्या मुलीची भूमिका साकारलेल्या रिंकूचा वैयक्तिक जीवनातील या पाश्चिमात्य लूकची नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. ‘सैराट’ चित्रपटाने रिंकू राजगुरूभोवती स्टारडमचे वलय निर्माण झाले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रिंकूने अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक रिआलिटी शोमध्ये देखील उपस्थिती लावली होती. त्यावेळी रिंकू पंजाबी ड्रेस आणि लांबसडक केसांची वेणी अशा लूकमध्ये दिसून आली होती. मात्र, यावेळी रिंकूचा मोकळे सोडलेले केस, फॅशनेबल लांब वेस्टर्न आऊटफिट कुर्ता आणि मेकअपमधील लूकचे छायाचित्र समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे छायाचित्र रिंकूचेच असल्याची पडताळणी अद्याप होऊ शकलेली नाही. मात्र, तिने हा लूक तिच्या नव्या चित्रपटासाठीचा तर नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.

रिंकूचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला नवा लूक-

Rinku-Rajguru-1