News Flash

सलमान खान या ‘पाच’ प्रश्नांची उत्तरं कधी देणार ?

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आज ५४ वर्षांचा झाला.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज ५४ वर्षांचा झाला. नुकताच त्याचा ‘दबंग ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. छोट्या पडद्यावरही सलमानच गाजताना दिसत आहे. ‘बिग बॉस १३’ हा शो सध्या टीआरपीमध्ये इतर शोपेक्षा फार पुढे आहे. सलमानला सगळ्याच माध्यमांमार्फत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच हसत खेळत राहतो. पण, तरीही असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं देणं तो प्रकर्षाने टाळतो.

सलमान खान लग्न कधी करणार?

संपूर्ण देशातील प्रसारमाध्यमं बॉलिवूडमधील सर्वात कूल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न सातत्याने विचारत आहेत. पण या प्रश्नाचे उत्तर अजूनही सलमानने दिलेले नाही. ऐश्वर्या राय ते लुलिया वंतूरपर्यंत अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सची नावं त्याच्याशी जोडली गेली. पण या प्रेमप्रकरणाचे रुपांतर लग्नात मात्र झाले नाही. म्हणूनच सलमान या प्रश्नाचे उत्तर देणे प्रकर्षाने टाळतो.

सलमानला राग का येतो?

‘दबंग’ खानचा राग फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही वारंवार पाहायला मिळतो. अनेकदा छायाचित्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या व्यक्तींवर हात उचलल्यानंतर सलमानची प्रतिमा मलिन झाली. चाहत्यांच्या मनात आपली प्रतिमा चांगलीच राहिली पाहिजे याची त्याला उपरती झाली आणि त्याने आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवायला सुरूवात केली. पण आजही जर कोणी त्याच्याशी वाद घातला तर सलमान त्याची दबंगगिरी दाखवतोच.

सलमानचा आवाज खराब कसा झाला?

काही आठवड्यांपूर्वीच बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये सलमानचा आवाज बिघडल्याचे पाहायला मिळाले. सलमानने तो पूर्ण एपिसोड बिघडलेल्या आवाजातच शूट केला. हवामानातील बदलामुळे त्याच्या आवाजात बदल झाल्याचे सांगण्यात येत होते.

लुलियाशी ब्रेकअप का केले?

सध्या सलमानचे नाव लुलिया वंतूरशी जोडले जात आहे. खानच्या अनेक खासगी सोहळ्यात लुलिया आवर्जुन उपस्थित असते. या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. पण दोघांनी कधीही याला मंजूरी दिली नाही. काही दिवसांनी लुलिया तिच्या मायदेशी परतली. त्यानंतर दोघांमध्ये नेहमीच दुरावा दिसण्यात आला. त्या दोघांमध्ये नेमका कशामुळे दुरावा आला हे अजून कळू शकले नाही.

कतरिनासोबतचे संबंध सुधारत आहेत?

ऐश्वर्या रायनंतर सलमानचे नाव सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडले गेले असेल तर ती म्हणजे कतरिना कैफ. या दोघांना एकत्र पाहण्याची अनेकांची इच्छा आहे. असे म्हटले जाते की, सलमानचा हात सोडून कतरिनाने रणबीर कपूरसोबत जाणे पसंत केले होते. पण रणबीर-कतरिनाचे नातेही फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा सलमान-कतरिनामध्ये जवळीक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा ही हीट जोडी कायमस्वरुपी जवळ येईल का या प्रश्नाचे उत्तरही त्याने द्यावे अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 7:30 am

Web Title: salman khan 5 unanswered questions mppg 94
Next Stories
1 नात्यांचे पदर दाखवणारी ‘दाह’ कथा, लवकरच मोठ्या पडद्यावर
2 अब लडना है! अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्यांसोबत दीपिकाचा खास व्हिडीओ
3 हिंदू धर्मियांना पटकन थंड होण्याचा एक रोग आहे – शरद पोंक्षे
Just Now!
X