अभिनेता अजय देवगण लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘मेडे’ असं आहे. अलिकडेच त्याने या चित्रपटाची घोषणा केली. बॉलिवूड डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. लक्षवेधी बाब म्हणजे याच दिवशी सलमान खानचा ‘राधे: द मोस्ट वॉण्टेड भाई’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ईदच्या निमित्तानं बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार एकमेंकांना आव्हान देताना दिसतील.
अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक
‘मेडे’ हा अजय देवगणचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन तो स्वत:च करणार आहे. शिवाय या चित्रपटात तो मुख्य व्यक्तिरेखा साकारताना देखील दिसेल. हा एक अॅक्शन थ्रिलरपट आहे. या चित्रपटात अजयसोबत अमिताभ बच्चन, रकूल प्रित सिंह देखील झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 19, 2020 5:22 pm