News Flash

कतरिनावर सलमानचाच वरदहस्त

सलमानच्या आगामी चित्रपटाबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सलमान खान, कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून सक्रिय आहे. तिने आजवर साकारलेल्या विविध भूमिका आणि चित्रपटांच्या मागे अभिनेता सलमान खानचे महत्त्वाचे योगदान असल्याचे म्हटले जात आहे. कतरिना आणि सलमान यांच्याविषयीच्या अनेक चर्चांना बी टाऊनमध्ये उधाण येत असते. त्यामुळे अनेकदा या दोन्ही कलाकारांच्या नात्याला रिलेशनशिपचेही नाव देण्यात आले. भाईजान सलमान आणि कॅट ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जनसत्ता या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार कतरिनाला तिच्या करिअरमध्ये चित्रपटांची निवड करण्यासाठी सलमान तिला मदत करतोय. सलमान कतरिनाला तिच्या चित्रपटांच्या निवडीसाठी मदत करण्यासोबतच कोणत्या प्रकारचे चित्रपट योग्य ठरतील याबाबतचा सल्लाही देतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मदतीला धावून जाण्यासाठी अभिनेता सलमान खान नेहमीच ओळखला जातो. त्यामुळे कतरिनासोबतच्या नात्यात दुरावा अल्यानंतरही सलमानने तिची मदत करण्याचे सोडले नाही. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असला तरीही तो कतरिनासोबतही तितकाच संपर्कात आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल असलेला ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटामध्ये सलमान वेगळ्या भूमिकेत दिसेल. तसेच आगामी चित्रपटामध्ये तो एका तेरा वर्षांच्या वडिलांच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सलमानच्या या भूमिकेबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सध्या कतरिना ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाद्वारे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सलमानही त्याच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील दिग्दर्शक, निर्माता करण जोहरला बऱ्याच काळापासून सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा होती. करणच्या ‘शुद्धी’ या चित्रपटात ‘दबंग’ खानची एण्ट्री झाली होती. मात्र, बरीच चर्चा होऊनही काही कारणास्तव हा चित्रपट बनला नाही. पण, करण आणि सलमानच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. एका चित्रपटासाठी सलमान खान आणि करण जोहर हे एकत्र आले असून यात बॉलीवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 5:46 pm

Web Title: salman khan become guide and helping katrina kaif in her carrier choices
Next Stories
1 ठाकूर अनुपसिंगचं ‘बेभान’ पोस्टर प्रदर्शित
2 नितारामुळे अक्षय कुमारच्या चित्रपटाला झाला फायदा
3 खेळाडूच्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘वलय’
Just Now!
X