25 November 2020

News Flash

शेराचे मानधन वाचून तुम्हालाही बसेल धक्का

तुम्ही महिन्याला घेऊ शकतात घरं

सलमान खान, शेरा

बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानची सावली बनून राहणारा बॉडीगार्ड शेरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या २० वर्षांपासून शेरा सलमानसोबत त्याच्या सावलीसारखा वावरतो. शेराची सलमानबाबतची आत्मियताही कधी लपली नाही. ‘सलमान खानसोबत मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहीन,’ असे शेराने अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे. शेरा पुढे म्हणाला की, मी कधीही भाईजानच्या मागे उभा राहत नाही. तर नेहमीच त्याच्या पुढे उभा राहतो. जेणेकरुन त्याच्यावर येणारं संकट मी माझ्यावर घेईल.

सलमानसाठी शेराची निवड सोहेल खानने केली होती. १९९५ मध्ये एका पार्टीत सलमान आणि सोहेल खानची ओळख शेराशी झाली. या पार्टीनंतर सलमान चंदीगढला गेला असता चाहत्यांच्या गराड्यात तो पुरता अडकला होता. तेव्हा सलमानला सुरक्षा रक्षकांची गरज असल्याचे सोहेलला जाणवले. तेव्हा सोहेलने शेराला संपर्क केला. तेव्हापासून शेरा हा खान कुटुंबाचाच एक भाग झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमानची २४ तास सुरक्षा करण्यासाठी शेराला महिना १५ लाख रुपये दिले जातात. शेराने १९९३ मध्ये टायगर सिक्युरिटी नावाने सुरक्षा रक्षक पुरवणारी एक कंपनी स्थापन केली होती. शेराशी करार करताना सोहेलने त्याला माझ्या भावासोबत कायम राहशील का असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना शेरा म्हणाला की, माझा मालकच माझ्यासाठी सर्वकाही आहे. तो माझा देवच आहे. मालक जिकडे जाईल त्यांच्यासोबत मी कायम असेल.

शेराचे मूळ नाव गुरमीत सिंह जॉली आहे. शेराचा जन्म एका शिख कुटुंबात झाला. शेराचे लहानपणी शिक्षणात फारसे मन रमले नाही. कसे- बसे त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शेराने पहिल्यापासूनच शरीरयौष्ठवकडे जास्त लक्ष दिले. शेरा अनेकदा सलमानसाठी तुरूंगातही गेला आहे.

शेराला एक मुलगा असून त्याचे नाव टायगर असे आहे. सलमान टायगरला आपला भाचाच मानतो. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान लवकरच टायगरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचे म्हटले जात आहे. टायगर सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. अभिनयाचे बारकावे तो शिकतही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 4:40 pm

Web Title: salman khan bodyguard shera salary who is shera story of salman khan and shera 2
Next Stories
1 ‘कसौटी जिंदगी की- २’ साठी एकताला नवी ‘कोमोलिका’ सापडेना?
2 या फोटोत कोण आहे तुम्ही ओळखलं का?
3 सलमानला पाठिंबा दर्शवण्यासाठी कलाकारांनी घेतली ट्विटरची मदत
Just Now!
X