News Flash

मी सामान्य वकुबाचा कलाकार, चाहत्यांनी तारलं – सलमान खान

'आमिर आणि शाहरुखला त्यांचं कौशल्य ठाऊक आहे. पण माझ्याबाबत ती खात्री नाही असं लोकांना बोलताना मी ऐकलंय.'

सलमान खान

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान वयाच्या ५३व्या वर्षीही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. सलमानचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करतात आणि चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. पण सलमान स्वत:ला सामान्य वकुबाचा कलाकार मानतो.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने त्याच्या यशाचं गमक सांगितलं. ‘देवाच्या कृपेने मी जे चित्रपट निवडले त्यांना यश मिळालं. पण याचा अर्थ असा नाही की आमिर खान किंवा शाहरुख खान यांच्या चित्रपटांची निवड चुकतेय. कधी कधी मी निवडलेल्या चित्रपटांचाही अंदाज चुकला.’

स्वत:च्या अभिनय कौशल्याबाबत चिंता व्यक्त करत सलमान पुढे म्हणाला, ‘आमिर आणि शाहरुख हे दोघे मोठे कलाकार आहेत. एखादा चित्रपट फ्लॉप होऊ शकतो. पण बॉक्स ऑफीसवर ते पुन्हा कमबॅक करतात. पण खरी चिंता तर माझी आहे. आमिर आणि शाहरुखला त्यांचं कौशल्य ठाऊक आहे. पण माझ्याबाबत ती खात्री नाही असं लोकांना बोलताना मी ऐकलंय.’

‘मी सामान्य वकुबाचा कलाकार आहे. पण चाहत्यांनी मला तारलंय. मी कशाप्रकारे या इंडस्ट्रीत टिकतोय हे मलाच नाही माहीत. पण माझी फॅन फॉलोइंग तगडी आहे. अक्षय कुमार, हृतिक रोशन, अजय देवगण प्रतिस्पर्धी आहेतच. त्यात वरुण धवन, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग यांसारखे नवे कलाकारसुद्धा आहेत. त्यामुळे प्रत्येकाला या इंडस्ट्रीत कौशल्यपूर्ण राहावंच लागतं,’ असं मत त्याने मांडलं.

यावेळी सलमानने चित्रपटांमधील न्यूडिटी आणि किसिंग दृश्यांपासून चार हात लांब राहणार असल्याचं स्पष्ट केलं. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यापूर्वी त्याचा ‘भारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 5:35 pm

Web Title: salman khan says i am surviving on mediocre talent
Next Stories
1 ‘अंधाधून’ चीनमध्ये तुफान कमाई; दोन आठवड्यांत १०० कोटींचा आकडा पार
2 मालिकेसाठी घर विकलं म्हणणाऱ्या अमोल कोल्हेंना दिग्दर्शकांचं खुलं पत्र
3 ‘सामान्य दर्जाच्या अभिनयाचं कौतुक करणं थांबवा’, कंगनाचा आलियावर हल्लाबोल
Just Now!
X