News Flash

“नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील”; सलमान खानचा संतप्त इशारा

सोशल मीडियावरून दिली ताकीद

सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाईजान’ नुकताच रिलीज झालाय. ईदच्या निमित्ताने बॉलिवूडच्या भाईजनने चाहत्यांना मनोरंजानाची ईदी दिली आहे. जगभरातील विविध सिनेमागृहांमध्ये तसचं विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय. मात्र अशातही काहींनी बेकायदेशीररित्या सिनेमाची पायरसी केल्याने आता दबंग खान चांगलाच भड़कला आहे.

सलमान खानचा ‘राध’ सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्याने सोशल मीडियावरून प्रेक्षकांनी योग्य प्लॅटफॉर्मवर सिनेमा पहावा अशी विनंती केली होती. तसचं मनोरंजनाच्या बाबतीत पायरसी नको असंही तो म्हणाला होता. मात्र त्यानंतरही अनेक प्रेक्षकांनी बेकायदेशीर रित्या काही वेबसाईटवर उपलब्ध असलेला सिनेमा पाहिल्याने सलमान चांहलाच संतापला आहे. सलमानने एक पोस्ट शेअर करत आता ताकीद दिली आहे.

या पोस्टमध्ये सलमान म्हणालाय, ” आम्ही प्रति व्हू २४९ या माफक दरात आमचा ‘राधे’ सिनेमा पाहण्यासाठी उपलब्ध केला आहे. तरीही काही पायरेटेड साईडस् ‘राधे’चं बेकायदेशीर प्रक्षेपण करत आहेत. जो की एक गंभीर गुन्हा आहे. सायबर सेल या सर्व बेकयदेशीर साईटसवर कारवाई करत आहे. कृपया पायरसीचा भाग बनू नका नाहीतर सायबर सेल तुमच्यावरही कारवाई करेल. कृपया हे लक्षात घ्या नाहीतर सायबर सेलच्या कारवाईमुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता.”असं म्हणत सलमानने पायरसी करणाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिलाय.

वाचा : “उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार”, वर्षभरानंतर कंगनाच्या ‘या’ वक्तव्यावर राम गोपाल वर्मा झाले व्यक्त

सिनेमा रिलिज होण्यापूर्वीच सलमानने एक व्हिडीओ शेअर करत पायरसीपासून दूर राहण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं.

दुसरीकडे सलमानच्या ‘राधे’ सिनेमाला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. तर काही प्रेक्षकांनी मात्र राधे पाहून निराशा झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी विविध मिम्स शेअर करत ‘राधे’ला नापसंती दर्शवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 12:33 pm

Web Title: salman khan warning said please do not participate in piracy serious action would be taken by cyber cell kpw 89
Next Stories
1 “उर्मिला सॉफ्ट पॉर्न स्टार”, वर्षभरानंतर कंगनाच्या ‘या’ वक्तव्यावर राम गोपाल वर्मा झाले व्यक्त
2 “बिग बॉसमध्ये खरोखरच अभिनव शुक्लाबद्दल ओढ निर्माण झाली”; राखी सावंतचा खुलासा
3 इंजिनिअरींग ते बॉलिवूड; विकी कौशलचा ‘जोश’पूर्ण प्रवास
Just Now!
X