19 September 2020

News Flash

भाचा आहिल करतोय सलमानची नक्कल!

आहिल आणि सलमानच्या चेहऱ्यावरील भाव दाखवणारा कोलाज अर्पिता खान शर्माकडून इन्स्टाग्रामवर शेअर

हा फोटो अर्पिता खानने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे

आहिल आणि सलमानच्या चेहऱ्यावरील भाव दाखवणारा कोलाज अर्पिता खान शर्माकडून इन्स्टाग्रामवर शेअर
सलमान खान हसत असेल, स्मितहास्य करत असेल, आनंदी असेल किंवा मग दु:खी असेल, त्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक हावभावाची एका छोट्याकडून नक्कल केली जाते आहे. सलमानच्या हावभावांची तंतोतंत कॉपी करणारा हा चिमुकला आहे सलमानचा भाचा आहिल.

सलमानच्या चेहऱ्यावरील विविध भाव आणि अगदी तसेच हावभाव असलेल्या छोट्या आहिलच्या फोटोंचा कोलाज असलेला एक फोटो अर्पिता खान शर्माने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये चिमुकल्या आहिलच्या चेहऱ्यावरील भाव आणि सलमानच्या चेहऱ्यावरील भाव यांच्यामध्ये कमालीचे साम्य दिसून येते आहे.

आहिल हे अर्पिता आणि आयुष शर्मा यांचे पहिले अपत्य. अर्पिता आणि आयुष २०१४ मध्ये विवाह बंधनात अडकले. हैदराबादमध्ये थाटामाटात हा सोहळा संपन्न झाला. आपल्या बहिणीच्या लग्नात सलमानने कोणतीही कसूर ठेवली नव्हती. मार्चमध्ये आहिलचा जन्म झाल्यानंतर संपूर्ण ‘खान’दानात आनंदाचे वातावरण होते.

सलमान अनेकदा आहिलसोबतचे फोटो पोस्ट करतो. आहिलचा सलमानसोबतचा पहिला फोटो सुलतानच्या पोझमध्ये होता. या फोटोमध्ये आहिलने स्टार लूक दिला होता. मात्र तो त्याच्या सलमान मामूला अगदी तंतोतंतपणे कॉपी करत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे.

सध्या सलमान कबीर खानच्या ट्युबलाईटच्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात व्यग्र आहे. भारत-चीन युद्धावर बेतलेल्या या चित्रपटात सलमान आणि सोहेल खान प्रमुख भूमिकेत आहेत. खऱ्याखुऱ्या आयुष्यात भाऊ असलेले हे दोन्ही या चित्रपटातही एकमेकांचे भाऊ असणार आहेत. याशिवाय सलमान कतरिना कैफसोबत ‘टायगर झिंदा है’ या ‘एक था टायगर’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 6:37 pm

Web Title: salman khans every expression is mirrored by nephew ahil see pics
Next Stories
1 …या कारणामुळे कतरिनाने अद्याप पाहिला नाही ‘ए दिल है मुश्किल’चा ट्रेलर
2 पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडसाठी किती महत्त्वाचे ?
3 तरुण असतो तर कदाचित देश सोडण्याचा विचार केला असता – इरफान खान
Just Now!
X