तेलगू अभिनेत्री समांथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या सिनेमांएवजी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. समांथा आणि तिचा पती अभिनेता नागा चैतन्यमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. समांथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सासरचं नाव काढून टाकल्याने या चर्चांना सुरुवात झाली होती.
समांथा आणि नागा चैतन्य विभक्त होणार या चर्चांना देखील आता उधाण आलं आहे. अशातच समांथाला नुकतच तिरुमाला मंदिराबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी समांथाला तिच्या आणि नागा चैतन्याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताच समांथा काहीशी चिडलेली दिसली. शिवाय तिने प्रश्न विचारणाऱ्याला देखील चांगलचं फटकारलं. समांथाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा: “तू घरी कधी येतोयस?”; दीपिका पदूकोणच्या प्रश्नावर रणवीर सिंहने दिलं ‘हे’ उत्तर
समांथाला मंदिराबाहेर तिच्या आणि नागा चैतन्याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी थोडी नाराज होत समांथाने तेलगूत उत्तर दिलं. “इथे मंदिरात आले आहे. तुम्हाला थोडी देखील अक्कल नाही का?” असं समांथा म्हणाली.
Sam really proud of you!! Some people don’t understand what to ask when .. Just loved that reply of yours !@Samanthaprabhu2
.
.#SamanthaAkkineni #SamanthaRuthPrabhu #Samantha pic.twitter.com/5RUO5bbhbz— Multi Fandom (@multifandom5928) September 18, 2021
हे देखील वाचा: “…म्हणून विसरत होते डायलॉग”; जुना व्हिडीओ शेअर करत जूही चावलाने सांगितला ‘तो’ किस्सा
समांथा आणि नागा चैतन्यामध्ये बिनसल्याच्या चर्चा रंगत असल्या तर अद्याप दोघांनी यावर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. २०१४ सालामध्ये आलेल्या ‘ऑटोनागर सूर्या’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी नागा चैतन्य आणि समांथाची ओळख झाली होती. तर २०१७ सालामध्ये दोघांनी गोव्यात लग्नगाठ बांधली होती. तेलगू सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणनू समांथा आणि नागा चैतन्याची जोडी लोकप्रिय होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैवाहिक जीवनात दरी निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.