News Flash

महाशिवरात्री निमित्ताने समृद्धी केळकरने सादर केली शिव वंदना

सोशल मीडि्यावर चाहत्यांकडून कौतुक

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या समृद्धी केळकरला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून सध्या समृद्धी कीर्ती या भूमिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. शिक्षणाचा ध्यास असलेल्या मात्र संसाराच्या गाड्यात अडकलेल्या मुलीची भूमिका ती साकारतेय. तर या मालिकेत तिच्या नायकाची म्हणजेच शुभमची व्यक्तिरेखा अभिनेता हर्षद अटकरी हा साकारत आहे.

सोशल मीडियावर देखील समृद्धी चांगलीच सक्रिय आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच समृद्धीने एक व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केलाय. महाशिवरात्री निमित्ताने समृद्धीने शिव वंदना सादर केली आहे. समृद्धीच्या या व्हिडीओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.समृद्धीने शिवरात्री विशेष भागासाठी खास लूक केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Loksatta (@loksattalive)

समृद्धीने कथकचं प्रशिक्षण घेतलंय. ‘पुढचं पाऊल’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकांमधुन तिने काही भूमिका साकारल्या होत्या. 2017 सालात आलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ या डान्स शोमध्ये तिने भाग घेतला होता. टॉप 5 स्पर्धकांमध्ये तिने बाजी मारली होती. त्यानंतर ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेतून समृद्धीला मुख्य नायिका म्हणून अभिनयाची संधी मिळाली. ‘दोन कटिंग’ या शार्ट फिल्ममध्ये समृद्धीची मुख्य भूमिका पाहायला मिळाली. या शॉर्ट फिल्मला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच या शॉर्ट फिल्मचा दुसरा भागही येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2021 5:06 pm

Web Title: samrudhi kelkar shares video of shiv vandana on occasion of shivratri kpw 89
Next Stories
1 ‘भगवान शंकराचा फोटो फॉर्वड करुन नाही…’, असे म्हणताच सोनू सूद झाला ट्रोल
2 ‘रुही’मध्ये मानले सुशांतसिंह राजपूतच्या मॅनेजरचे आभार
3 आईच्या आठवणीत ‘या’ अभिनेत्याची भावूक पोस्ट, “प्रत्येक आईत मला तूच दिसतेस”
Just Now!
X